परळी वैजनाथ (बीड)- बारा जोतिर्लिंगापैकी एक असलेले परळी येथील प्रभू वैद्यनाथाचे मंदिर ८ मार्च ते १६ मार्चदरम्यान पूर्ण: बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. महाशिवरात्रीच्या निमित्ताने वैद्यनाथ मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे मंदिर बंद ठेण्याचे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी दिले आहेत.
महाशिवरात्रीच्या दिवशी प्रभू वैद्यनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी बंद ऐन महाशिवरात्रीलाच भाविक दर्शनाला मूकणार
प्रभूंच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भावीक येत असतात. प्रभूंच्या दर्शनाने पावन होऊन जातात. परंतू कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे मंदिर पूर्णपणे बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. इतिहासात पहिल्यांदाच ऐवढा मोठा महाशिवरात्रीचा यात्रा महोत्सव रद्द केल्याने ऐन महाशिवरात्रीलाच भाविक वैद्यनाथाच्या दर्शनाला मूकणार आहे.
कोरोनाचा वाढता प्रभाव
बीड जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिनांक ११ मार्च रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व शिवालये दर्शनासाठी पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले आहेत. सदरील कालावधीत प्रथेप्रमाणे संबंधित पुजारी व विश्वस्त यांनी कोरोनाविषयक नियमाचे पालन करून पूजा व इतर बाबी करण्यास परवानगी देण्यात आली आहे.