बीड -महिलांमध्ये जागृती वाढली आहे, महिला अधिक सक्षम होत आहेत, महिलांची शक्ती क्रांती घडवू शकते, हे आपण इतिहासामध्ये डोकावले तर स्पष्ट होईल, असे मत रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केले. आता महाराष्ट्रात आणि बीडमध्ये इतिहास घडवायचा आहे. त्यासाठी महिलांनाही हातात धनुष्य घ्यावे लागेल. एक भाऊ म्हणून मी तुमच्या कायम पाठीशी आहे आणि राहीन, असा विश्वास क्षीरसागर यांनी दिला. शिवसेना महिला कार्यकारणी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.
हे ही वाचा -धक्कादायक! बीडमधील १३ हजारांपेक्षा अधिक ऊसतोड कामगार महिलांचे गर्भाशय काढले - नीलम गोऱ्हे
सध्या महिला चूल व मूल एव्हढ्यापुरते मर्यादित न राहता स्वतःहून पुढे येऊन काम करू लागल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून आम्ही बचत गटाच्या माध्यमातून महिलांसाठी विविध योजना राबवत आहोत. बीड आणि ग्रामीण भागातील महिलांच्या हाताला काम देण्यासाठीही वेगळी चळवळ उभी केली. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. बीडच्या महिलांनी स्वतः बनवलेल्या वस्तूंना मुंबई सारख्या शहरात बाजार पेठ मिळाली आहे. ही अभिमानाची बाब असून महिलांनी जागरूक राहून आपल्याला सहकार्य करणाऱ्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे, असे मत नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागर यांनी मांडले.
हे ही वाचा -आरक्षणासाठी वंजारी समाजाचा बीडमध्ये आक्रोश, पंकजांसह धनंजय मुंडेंना केले लक्ष्य
यावेळी रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर पुढे बोलताना म्हणाले की, सणांचे दिवस असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती पाहता शिवसेनेला व्यापक रूप मिळत आहे. महिला ही संसाराचे एक चाक आहे. संसाराचा गाडा ओढण्यासाठी महिला बचत गट सक्षम होणे गरजेचे आहे आणि म्हणूनच बीडमध्ये शिवसेनेच्या वतीने महिला बचत गटांना ताकद देण्याचे काम शासनाच्या माध्यमातून सुरू आहे. मंत्रिपद कशासाठी तर जनतेच्या हितासाठी आहे. गोर गरीब जनता हेच शिवसेनेचे कायम केंद्रबिंदू राहिले आहे म्हणूनच बीड शहरात जनतेच्या आरोग्यासाठी 300 खाटांचे शासकीय रुग्णालय लवकर उभे राहत आहे. शहरवासीयांना शुद्ध आणि स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. सध्या बीड जिल्हा दुष्काळाचा सामना करत आहे. अशीच परिस्थिती कायम राहिली तर पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होईल. त्यासाठी आपण समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत. तुमचे प्रश्न हे माझे प्रश्न आहेत. तुमच्या समस्या या माझ्या समस्या असतील एक भाऊ म्हणून मी कायम तुमच्या पाठीशी आहे आणि राहील, महिला आता जागृत झाल्या आहेत, महिलांची शक्ती क्रांती घडवू शकते, परिस्थिती बदलण्यासाठी आता महिलांनी ही धनुष्य हातात घ्यायचा आहे असे आवाहन त्यांनी केले.
हे ही वाचा -सत्ता द्या 6 महिन्यात शेतकर्यांचा सातबारा कोरा करू- अजित पवार
यावेळी व्यासपीठावर महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह उपजिल्हाप्रमुख बंडू पिंगळे, वैजनाथ तांदळे, तालुका प्रमुख गोरख सिंगण, सुनील सुरवसे, दिलीप भोसले, किशोर पिंगळे, जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर, प्राचार्या दिपाताई क्षीरसागर , संगीता चव्हाण, आयोजक डॉ. सारिका क्षीरसागर,कमलताई बांगर, प्रमिला माळी, शुभांगी कुदळे आदि उपस्थित होते. हरतालिका सण असतानाही मोठया संख्येने महिलांची उपस्थिती होती.