बीड :मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरील अटक वॉरंट आज परळी न्यायालयाने रद्द केले. 2008 मध्ये एका प्रकरणात न्यायालयाने राज ठाकरेंना अटक वॉरंट जारी केले होते. अटक वॉरंट रद्द करण्यासाठी राज ठाकरे आज स्वत: परळी न्यायालयात हजर झाले होते. यावेळी न्यायालयाने राज ठाकरे यांच्यावर 500 ठोठावला. तसेच अटक वॉरंट रद्द केले आहे अशी माहिती अॅड. अर्चित साखळकर यांनी दिली.
ठाकरे यांच्याविरोधात विरोधात अटक वॉरंट -2008 साली राज ठाकरे यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी ते आज परळी न्यायालयासमोर राज ठाकरे हजर झाले. कोविड काळामध्ये कोर्टाची सुनावणी असताना न्यायालयाने ठाकरे यांच्याविरोधात अटक वॉरंट काढले होते. त्यानंतर राज ठाकरे यांची सर्जरी झाल्याने त्यांना डॉक्टरांनी काही प्रोटोकॉल फॉलो करायला सांगितले होते. त्यामुळे ठाकरे यांना लांबचा प्रवास करणे शक्य नव्हते. त्यामुळे ठाकरे आज न्यायालयासमोर हजर झाले. त्यांच्या म्हणण्यानुसार आमच्या सर्व वकील मंडळींनी त्यांचा एक अर्ज न्यायालयात दाखल केला. त्यात सर्व कारणे नमूद केली आहेत. जारी केलेले वॉरंट रद्द करण्याची विनंती न्यायालयाला करण्यात आली. न्यायालयाने कोर्टात हजर राहण्याची दखल घेत त्यांचे वॉरंट रद्द केले आहे, असे वकिलांनी सांगितले.
राज ठाकरे हेलिकॉप्टरने मुंबईहून थेट परळीला - राज ठाकरे आज सुनावणीसाठी परळी कोर्टात येणार असल्याने याठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. राज ठाकरे हेलिकॉप्टरने मुंबईहून थेट परळीला आले. याठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर राज ठाकरे यांनी गोपीनाथ गडावर जाऊन समाधीचे दर्शन घेतले. तेथून राज ठाकरे थेट परळी कोर्टाकडे रवाना झाले होते.