महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'इंगळे महाराज यांच्या निधनाने वाकरी संपरदायात मोठी पोकळी निर्माण झाली' - former minister Jaydatta Kshirsagar

विनोदाचार्च ह. भ. प बाबासाहेब महाराज इंगळे यांचे निधन झाल्याने सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेबद्दल माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी, इंगळे महाराज यांच्या निधनाने वाकरी सांप्रदायात मोठी पोकळी निर्माण झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

ह.भ.प.इंगळे महाराज
ह.भ.प.इंगळे महाराज

By

Published : May 14, 2021, 3:37 PM IST

बीड -आपल्या विनोदी शैलीत वारकरी सांप्रदायाची पताका सर्वदूर पोहचवणारे कीर्तनकार ह. भ. प. बाबासाहेब महाराज इंगळे यांचे दुःखद निधन झाले. इंगळे महाराज यांच्या निधनाने वारकरी सांप्रदायात मोठी पोकळी निर्माण झाल्याची प्रतिक्रिया माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केली.

बाबासाहेब महाराज इंगळे यांनी सुमारे ५ दशके कीर्तनाच्या माध्यमातून समाजात संत साहित्य पोहोचवले. यासोबतच समाजसेवा म्हणूनही इंगळे महाराज यांनी वडवणी तालुक्यातील चिंचवडगाव येथे 'परमार्थ आश्रमाची' स्थापना केली होती. या आश्रमाच्या माध्यमातून गोर-गरिबांच्या मुला-मुलींचे विवाह लावण्याचे काम त्यांनी केले. इंगळे महाराजांची विनोदी शैली ही अजोड होती. कीर्तनाच्या माध्यमातून महाराजांनी ग्रामीण विनोदी शैलीतून संतांचे विचार जन-माणसांत पोहचवले. त्यांच्या निधनामुळे वारकरी सांप्रदायात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिली.

हेही वाचा -मराठा आरक्षणाचा लढा अजून संपलेला नाही..! केंद्राच्या भूमिकेचे संभाजीराजेंकडून स्वागत

ABOUT THE AUTHOR

...view details