महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सरकारने शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी, पंचनामे करणारे अधिकारी नदीच्या कडेने फिरतात -सुरेश धस - नुकसान भरपाई

बीड जिल्ह्यातील 63 महसूल मंडळांपैकी जवळपास 50 महसूल मंडळात अतिवृृृृृष्टी झाली आहे. मात्र, सरकारने या शेतकऱ्यांना कोणतीच नुकसान भरपाई दिलेली नाही. तसेच, पिकाच्या पंचनाम्याचे नाटक करू नका. दरम्यान, कसलेही पंचनामे न करता हे अधिकारी फक्त नदीच्या आणि वड्याच्या कडेला जाऊन फिरत असल्याचा आरोप भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांंनी केला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

आमदार सुरेश धस
आमदार सुरेश धस

By

Published : Sep 11, 2021, 1:05 AM IST

बीड (आष्टी) -बीड जिल्ह्यातील 63 महसूल मंडळांपैकी जवळपास 50 महसूल मंडळात अतिवृृृृृष्टी झाली आहे. मात्र, सरकारने या शेतकऱ्यांना कोणतीच नुकसान भरपाई दिलेली नाही. तसेच, पिकाच्या पंचनाम्याचे नाटक करू नका. दरम्यान, कसलेही पंचनामे न करता हे अधिकारी फक्त नदीच्या आणि वड्याच्या कडेला जाऊन फिरत असल्याचा आरोप भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांंनी केला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी नुकसान झालेल्या 50 मंडळाला सरकारने तत्काळ मदत सरावी अशी मागणीही केली आहे.

पत्रकारांशी बोलताना आमदार सुरेश धस

'पंचनामे करणारे हे फक्त नदीच्या कडेनेच पंचनामे करतात'

बीड तालुक्यातील तीन मंडळं, आष्टीतील एक मंडळं, आंबाजोगाई, केज, परळी प्रत्येकी 3 असे एकूण तेरा मंडळ सोडता जिल्ह्यात ५ ते ६ तारखेला सरासरी 34 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तसेच, बीड तालुक्यातील पिंपनेर मंडळात तीन दिवस अतिवृष्टी झाली आहे. दरम्यान, एफडीआरनुसार 65 टक्के मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला असेल, तर जिल्ह्यातील तेरा मंडळ सोडता उर्ववरीत 50 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. या पन्नास मंडळात जेवढी पेर झाली तेवढी भरपाई देणे गरजेचे आहे. मात्र, पंचनामे कशाला करायचे आणि पंचनामे करणारे हे फक्त नदीच्या कडेनेच पंचनामे करतात. पाऊस फक्त नदीच्याच कडेला पाऊस पडतो का? असा सवाल उपस्थित करत धस यांनी सरकारवर जोरदार टीका केली. दरम्यान, एक लाख 34 हजार क्युसेसने माजलगांव धरणातील पाणी सोडावे लागले. आष्टी तालुक्यातील मेहकरी धरण सोडता सर्व तलाव ओहरफ्लो झाले आहेत. अशी माहितीही धस यांनी यावेळी दिली आहे.

'कोकण धरतीवर मदत करावी'

राज्याचे मुख्यमंञी उध्दव ठाकरे यांनी कोकणात सरसकट मदत जाहीर केली. त्याच धरतीवर बीड जिल्ह्यातील सर्व मंडळांना कसलाही पंचनामा न करता मदत करावी, अशी मागणीही धस यांनी यावेळी केली आहे.

'या सरकारने शेतकऱ्यांची मदत बंद केली'

देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात प्रत्येक शेतकऱ्यांना दर महिन्याला काहीतरी मदत मिळाल्याने काहीतरी आधार निर्माण होत असे. पण हे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांना कसलीच मदत दिली नाही. मात्र, या सरकारकडे आमदारांना (25-15)मधून कामे देण्यासाठी भरपूर निधी आहे. पण शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारकडे पैसा नाही. याचा अर्थ सरकार मदत करण्यासाठी उत्सूक नसल्याचे दिसते असही धस म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details