महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 4, 2021, 7:19 PM IST

ETV Bharat / state

शिक्षक संघटनांच्या दबावानंतर ऑनलाइन बदल्यांचा निर्णय कायम

शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन पद्धतीनेच होणार आहेत. मंगळवारी मंत्रालयात झालेल्या शिक्षक संघटनांच्या बैठकीनंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी तसे आदेश काढले.

mushrif
mushrif

परळी वैजनाथ (बीड) -शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन पद्धतीने न करता ऑफलाइन करण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारने केली होती. ती घोषणा हवेत विरली असून शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन पद्धतीनेच होणार आहेत. ग्रामविकास मंत्री असताना पंकजा मुंडे यांनी अशाप्रकारची भूमिका घेतली होती.

शिक्षक संघटना आक्रमक

ऑनलाइन बदल्यांचे शिक्षक संघटनांनी स्वागत केले होते. मात्र ऑफलाइन बदल्यांची घोषणा महाविकास आघाडी सरकारने केली. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शिक्षक संघटना आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी याला कडाडून विरोध दर्शविला. अखेर या आक्रमकतेपुढे सरकार झुकले आणि आधीचाच निर्णय कायम ठेवला.

मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर निर्णय

मंगळवारी मंत्रालयात झालेल्या शिक्षक संघटनांच्या बैठकीनंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी तसे आदेश काढले. देशाची भावी पिढी घडविणाऱ्या शिक्षकांना बदल्यांसाठी त्रास होऊ नये, वारंवार खेटे मारावे लागू नये, यासाठी बदली प्रक्रिया सुलभ व पारदर्शक करणाच्या दृष्टीकोनातून हा निर्णय झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details