महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गाढे पिंपळगाव येथील गावकऱ्यांनी कोरोनाला वेशीवरच रोखले - PARLI VAIJANATH

गाढे पिंपळगावात पहिल्या लाटेपासून आजपर्यंत गावात १० ते १५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. सध्या जवळपास सर्वच कोरोना मुक्त झाले आहेत. जवळपासच्या गावात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव जाणवत आहे. पण गाढे पिंपळगाव कोरोना मुक्तीकडे वाटचाल करत आहे. तसेच आरोग्य विभागाने १० एप्रिलला गावात लसीकरण कॅम्प घेतला. यात ५३९ रहिवाशांचे लसीकरण करण्यात आले.

गाढे पिंपळगाव
गाढे पिंपळगाव

By

Published : Apr 28, 2021, 10:32 PM IST

परळी वैजनाथ (बीड) - तालुक्यातील गाढे पिंपळगाव हे गाव शहरापासून १८ किलोमीटर अंतरावर असून गावाची लोकसंख्या अंदाजे ४ ते ५ हजार इतकी आहे. गावातील सर्व व्यवहार परळी शहरावर अवलंबून आहेत. असे असताना गावकऱ्यांनी एकत्र येवून शासकीय नियमांचे पालन करत एकजुटीने कोरोनाला हरवले आहे. गावाच्या या यशात आरोग्य विभागासह, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य गावकरी यांचे योगदान आहे.

गाढे पिंपळगावने कोरोनाच्या पहिल्या लाटेला अनेक दिवस वेशीवरच अडवले होते. यासाठी शासनाच्या नियमांचे ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी तंतोतंत पालन केले होते. गावातील अनेक रहिवासी नौकरी, रोजगाराच्या निमित्ताने पुणे, मुंबई, औरंगाबाद येथे स्थलांतरित झाले आहेत. पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्थलांतरित झालेले अनेक कुटुंबे गावाकडे आलीत. यावेळी शासनाच्या नियमानुसार या कुटुंबांना गावात आल्यावर १४ दिवस क्वारंटाइन व्हावे लागले. ज्यांची व्यवस्था आहे त्यांना घरी सोडण्यात आले व ज्यांची व्यवस्था नाही अशा रहिवाशांना गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत क्वारंटाइन करण्यात आले. यांची सर्व व्यवस्था त्यावेळी ग्रामपंचायतकडून करण्यात आली होती. मात्र सर्वच ठिकाणी प्रादुर्भाव वाढल्याने या गावातही कोरोनाने प्रवेश केला. कोरोनाचा प्रवेश होताच ग्रामपंचायतच्या वतीने फवारणी करुन वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात येत होते. यामुळे कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव वाढला नाही. फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आली. या लाटेत शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला. यामुळे शासनाने लॉकडाऊन केले. लॉकडाऊनच्या नियमांचे ग्रामपंचायतीच्या वतीने जास्तीत जास्त अंमलबजावणी कशी करता येईल, यासाठी प्रयत्न केला गेला. ग्रामपंचायतीच्या वतीने गावकऱ्यांना सातत्याने जाणीव करून देण्यात आली. लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेसाठी सकाळी ७ ते ११ यावेळेतच परवानगी देण्यात आली आहे. या नियमांचीही गावात काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत आहे.

पहिल्या लाटेपासून आजपर्यंत गावात १० ते १५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. सध्या जवळपास सर्वच कोरोना मुक्त झाले आहेत. जवळपासच्या गावात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव जाणवत आहे. पण गाढे पिंपळगाव कोरोना मुक्तीकडे वाटचाल करत आहे. तसेच आरोग्य विभागाने १० एप्रिलला गावात लसीकरण कॅम्प घेतला. यात ५३९ रहिवाशांचे लसीकरण करण्यात आले. लॉकडाऊनमध्ये गावच्या सरपंच वर्षा सोनवणे, उपसरपंच रामेश्वर वाघमोडे आणि सर्व सदस्य आणि गावकऱ्यांचा सहभाग आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details