बीड -सर्वत्र कोरोनाचा कहर सुरू आहे. त्यातचबीडमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पत्नीचा मृतदेह पतीने रुग्णालयातून परस्पर पळवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी डॉक्टर आणि नर्सच्या तक्रारीवरून पती व नातेवाईकांविरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशापद्धतीने मृतदेह पळवण्याची बीड जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे.
'गेवराई तालुक्यातील कुंभारवाडी येथील सुरवसे कुटुंबातील कोरोना पॉझिटिव्ह महिला गेल्या 28 दिवसापासून जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होती. उपचारादरम्यान संबंधित महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर डॉक्टर आणि नर्स यांनी मृतदेह अंत्यविधीसाठी देता येणार नाही, असे सांगितले. तरीही कुठलीही काळजी न घेता, वैद्यकीय तपासणी न करता संबंधित कुटुंबिय महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन गावाकडे गेले', असे डॉक्टरांनी तक्रारीत नमूद केले आहे.
नजर चुकवून मृतदेह घेऊन जाण्याचा प्रयत्न