बीड- जिल्ह्यातील लोखंडी सावरगाव येथील शासकीय कोविड सेंटरमध्ये दाखल असलेल्या रुग्णांचे रक्त तपासणीसाठी खासगी प्रयोगशाळेत पाठवले जात आहे. या शासकीय कोविड सेंटरमध्ये सर्व सुविधा असातानाही रुग्णांना खासगी प्रयोगशाळेत रक्त तपासणी करण्यास भाग पाडून त्यांची लूट केली जात असल्याचा आरोप अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथील जिल्हा परिषद सदस्य अविनाश मोरे यांनी केला आहे.
माहिती देताना जिल्हा परिषद सदस्य रुग्णांची लूट करणारे रॅकेट सक्रिय
अंबाजोगाई तालुक्यात इतर दोन ठिकाणी देखील सेवाभावी सस्थांचे कोविड सेंटर आहे. या ठिकाणी दाखल असलेल्या रुग्णांच्या तपासणीसाठी शासकीय रुग्णालयातील डॉक्टर लवकर फिरकतही नसल्याचे आरोपही करण्यात आले आहेत. गोरगरीब रुग्णांची आर्थिक लूट करणारे रॅकेट सक्रिय झाले आहे की काय, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. याबाबत प्रतिक्रिया बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांना संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
हेही वाचा -खांबावरील लाईन दुरुस्त करताना अचानक सुरु झाला विद्युत पुरवठा.. वायरमनचा जागीच मृत्यू