महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक! बीडमध्ये दोन दिवसांत 10 मोरांचा मृत्यू

शुक्रवारी सकाळी शिरूर कासार तालुक्यातील लोणी शिवारात 5 मोर मृतावस्थेत आढळून आले होते. शनिवारी दुपारी चार वाजता पुन्हा लोणी शिवारातच एका ज्वारीच्या शेतात 5 मोर मृतावस्थेत आढळून आले आहे. सलग दोन दिवसांपासून मोरांचे मृत्यू होत असल्याने ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे.

ten peacocks died in two days in beed
धक्कादायक! बीडमध्ये दोन दिवसांत 10 मोरांचा मृत्यू

By

Published : Jan 23, 2021, 6:56 PM IST

बीड- दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यात मोरांच्या मृत्यूचे सत्र सुरू आहे. शुक्रवारी सकाळी शिरूर कासार तालुक्यातील लोणी शिवारात 5 मोर मृतावस्थेत आढळून आले होते. शनिवारी दुपारी चार वाजता पुन्हा लोणी शिवारातच एका ज्वारीच्या शेतात 5 मोर मृतावस्थेत आढळून आले आहे. सलग दोन दिवसांपासून मोरांचे मृत्यू होत असल्याने ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे. बीड जिल्हा प्रशासन मोरांचे मृत्यू रोखण्यासाठी ठोस अशी पावले उचलत नसल्याचे तेथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

दोन दिवसांत 10 मोरांचा मृत्यू -

बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्‍यात लोणी-वारणी शिवारातील मोरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात बर्डफ्लूची साथ असल्याने अनेक ठिकाणी पक्षांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. धक्कादायक म्हणजे मागील दोन दिवसांत बीड जिल्ह्यात 10 मोरांचा मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे. शनिवारी दुपारी चार वाजता पुन्हा लोणी शिवारात एका ज्वारीच्या शेतामध्ये 5 मोर मृतावस्थेत आढळून आल्याने येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोरांचे होत असलेल्या मृत्यू संदर्भाने जिल्हा प्रशासनाने तत्काळ योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. शनिवारी आढळून आलेल्या मृत मोरा संदर्भात तालुका पशुसंवर्धन विभागाला कळवले असल्याचेही येथील ग्रामस्थांनी सांगितले.

हेही वाचा - ईडीकडून विवा ग्रुपची नऊ तास चौकशी, मेहुल ठाकूरसह मदन गोपाल यांना अटक

ABOUT THE AUTHOR

...view details