बीड - जनावराचे मांस घेवून जाणारा टेम्पो बीड जवळील मांजरसुंबा घाटात बुधवारी सांयकाळी पलटी झाला. घटना घडल्यानंतर बीड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला आहे. टेम्पोतील मांस कशाचे आहे, याची चौकशी पोलीस करत आहेत.
मांस घेवून जणारा टेम्पो मांजरसुंब्याच्या घाटात उलटला.. - tempo
गणेश राजेंद्र तट असे टेम्पो चालकाचे नाव आहे. टेम्पो (क्र. एम एच २५ पी. ३१८५) मांस घेवून हैद्राबादहून औरंगाबादकडे चालला होता. बीड जवळील मांजरसुबा येथील घटात समोरुन आलेल्या चारचाकीला चुकविण्याच्या नादात टेम्पो पलटी झाला. या टेम्पोत जनावरांचे अवयव होते.
मांस वाहून नेणारा टेम्पो
गणेश राजेंद्र तट असे टेम्पो चालकाचे नाव आहे. टेम्पो (क्र. एम एच २५ पी. ३१८५) मांस घेवून हैद्राबादहून औरंगाबादकडे चालला होता. बीड जवळील मांजरसुबा येथील घटात समोरुन आलेल्या चारचाकीला चुकविण्याच्या नादात टेम्पो पलटी झाला. या टेम्पोत जनावरांचे अवयव होते. पोलिसांनी चालक गणेश तट याला ताब्यात घेतले असून, त्या टेम्पोतील मांस कशाचे आहे याची चौकशी सुरू केली आहे.