महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

King Harishchandra Temple : दानशूर राजा हरिश्चंद्राचे अनोखे मंदिर, घ्या दक्षिणमुखी शिवलिंगाचे दर्शन - राजा हरिश्चंद्राचा मुलगा गुरु रविदास

जगामध्ये तीन युग पार‌ पडले आहेत. त्यामध्ये सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, आणि सध्या चालू आहे ते कलियुग आहे. द्वापार युगामध्ये घडलेली एक अख्यायिका आहे आणि ती म्हणजे राजा हरिश्चंद्र यांनी स्वप्नात दिलेले दान सत्यात उतरवले होते. त्यामुळे राजा हरिश्चंद्राला दानशूर राजा म्हणून ओळखलं जातं. श्रीराम प्रभूचे आठवे वंशज म्हणून राजा हरिश्चंद्रला ओळखलं जातं आणि राजा हरिश्चंद्राची पत्नी तारामती व मुलगा गुरु रविदास हे होते. याविषयीचा 'ईटीव्ही भारत' ने घेतलेला एक आढावा...

King Harishchandra Temple
दानशूर राजा हरिश्चंद्राचे देशातील एकमेव मंदिर

By

Published : Mar 13, 2023, 11:55 AM IST

Updated : Mar 13, 2023, 12:43 PM IST

प्रतिक्रिया देतांना मंदिरातील पूजारी आणि भक्त

बीड : द्वापार युगामध्ये राजा हरिश्चंद्र हे एक दानशूर राजा म्हणून होऊन गेले. अनेक राज्यातील लोकांना राजा हरिश्चंद्रांनी दान केले आणि विशेष म्हणजे त्यांच्या स्वप्नामध्ये ज्या लोकांनी येऊन त्यांना दान मागितले, ते दुसऱ्या दिवशी सकाळी प्रत्यक्षात त्या व्यक्तीला दान द्यायचे. त्यामुळे एक मन आजही प्रसिद्ध आहे ती म्हणजे 'तू काय राजा राजा हरिशचंद्रासारखा दानशूर आहेस का...?' स्वप्नात दिलेले दान सुद्धा सत्यात उतरवण्याची हिंमत या राजा हरिश्चंद्रमध्ये होती.


काय आहे राजा हरिश्चंद्राची अख्यायिका... : जे चार योग घडले त्या चार युगातील द्वापार युगाच्या वेळेस या ठिकाणी हरिश्चंद्र राजा आले. स्वर्गामध्ये एक सभा भरली होती त्या सभेमध्ये विश्वमित्र होते, वशिष्ठ होते, त्या सभेला अनेक देव उपस्थित होते आणि त्यासभेला नारद उपस्थित राहिले. नारदाला विचारले की, 'तुम्ही या ठिकाणी येण्याचं प्रयोजन काय? तुम्ही कुठून आलात? मग त्यावेळेस नारदांनी सांगितलं की, मी मृत्यू लोकातून आलेलो आहे, राजा हरिश्चंद्रा सारखा तत्वशिल राजा नाही.

विश्वमित्राने घेतली परिक्षा :जे नारद बोलले ते विश्व मित्राला सहन झाले नाही. विश्वमित्र म्हणाला मी त्यांची परीक्षाच घेतो, मग विश्वमित्र मृत्यू लोकात आले आणि या ठिकाणी पोहोचले, आणि मग आपण काय केलं पाहिजे हे विश्व मित्राच्या लक्षात येईना. मग थोडा विचार करून त्यांच्या लक्षात आलं की, आपण आता मायावी पक्षी बनवुन अयोध्या मध्ये पाठवायचे. मग त्यांनी मायावी पक्षी तयार करुन; अयोध्या मध्ये पाठवले. त्यामध्ये लांडगा, वाघ, सिंह प्राणी होते. त्या ठिकाणी पशुपक्षी पाहून अयोध्येतील जनता घाबरली. त्यांनी राजाला सांगितलं की, मायावी पक्षी या ठिकाणी आलेले आहेत. वाघ सिंह आलेले आहेत आणि लोकांना मारत आहेत, आणि मग राजाने हे मायावी प्राणी कुठून आले आहेत त्याचा माग काढला. आणि ते आजच्या हरिश्चंद्र पिंपरी ठिकाणी आले.

विश्वमित्राने मागितले राजा हरिश्चंद्राला राज्य दान : हरिचंद्र राजा बरोबर प्रधान आणि दोन शिपाई असे चार जण या ठिकाणी आले. रात्री मुक्काम केला आणि रात्री झोपले व राजा हरिश्चंद्राला एक स्वप्न पडले. त्या स्वप्नामध्ये विश्वमित्र राजा हरिश्चंद्र ला राज्य दान मागायला आलेले आहेत आणि त्यावेळेस राजा हरिश्चंद्राने विश्व मित्राला राज्य दान दिले. आणि मग सकाळी प्रत्यक्षात विश्वमित्र राजा हरिश्चंद्र ला दान मागायला आले. विश्व मित्राने सर्व खजिन्याच्या चाव्या मागितल्या. मग हरिश्चंद्र राजा विश्व मित्राला म्हणाले, 'चला अयोध्येला मी तुम्हाला राज्य दान देतो. मग ते या ठिकाणावरून अयोध्येला गेले व अयोध्येला गेल्यानंतर राजा हरिश्चंद्रांनी आदेश दिले की, यांना जे मागेल ते द्या.

हरिश्चंद्रांनी आपली बायको आणि मुलगा विकला : मग विश्वमित्र मनाला हे मला असलं काही नको, मला तुझ्या डोक्यावरचा मुकुट हवा आहे आणि या सगळ्या खजिन्याच्या चाव्या मला पाहिजे आहेत. यावर राजा हरिश्चंद्रांनी होकार दिला. आठ दिवसाचा करार केला. राज्याच्या वर तीन भार सोनं मागितले. मग राजा हरिश्चंद्र तीन भार सोनं देण्यासाठी काशीला गेले व त्या ठिकाणी ब्राह्मणाला आपली बायको व मुलगा विकला. आणि तीन भार सोनं विश्व मित्राला दिले. त्यानंतर काही दिवसातच राजा हरिश्चंद्राचा असणारा एकुलता एक मुलगा मरण पावला आणि मरण पावल्यानंतर तो जाळण्यासाठी त्या स्मशानभूमीमध्ये घेऊन गेले. त्या ठिकाणी राजा हरिश्चंद्र काम करत होते. मग राजा हरिश्चंद्राने आपल्याच बायकोला येथे मृतदेह जाळण्यासाठी दक्षिणा द्यावी लागते, असे सांगितले. मात्र माझ्याकडे द्यायला दक्षिणा नसल्याचे बायकोने सांगताच, मग इथे मुलाला जाळू देणार नाही, असे राजा हरिश्चंद्र म्हणाले.

परीक्षेत पास होताच गेलेलं वैभव परत मिळालं :यावरुन दोघांमध्ये वाद झाला आणि त्यामध्ये राजा हरिश्चंद्र यांनी आपल्या पत्नीवर तलवार काढली. त्यावेळेस तीच तलवार देवाने धरली, आणि देवाने राजा हरिश्चंद्र ला सांगितले की, तुला जे मागायचे आहे ते माग. त्यावेळेस राजा हरिश्चंद्राची पत्नी तारामतीने म्हणटले की, हरिश्चंद्रासारखा दानशूर नवरा आणि गुरु रविदासा सारखा पुत्र, हे मला द्या आणि त्यावेळेस देवाने त्यांना तथास्तु म्हणून आर्शीवाद दिला. आणि म्हटले की, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत, तुमचं नाव राहील. पण राजा हरिश्चंद्रानी काहीच मागितलं नाही. त्यावेळेस देवाने त्यांची ज्योत आपल्या ज्योत मध्ये सामावुन घेतली. तेव्हापासून राजा हरिश्चंद्राची कीर्ती अजरामर आहे.



काय आहे राजा हरिश्चंद्राचा इतिहास :राजा हरिश्चंद्र पिंपरी हे गाव बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील वडवणी शहरापासून अगदी आठ ते दहा किलोमीटर अंतरावर आहे. हे अत्यंत पुरातन मंदिर आहे आणि राजा हरिश्चंद्राचा असा इतिहास सांगितला जातो की, द्वापार युगातील सत्यवादी राजा हरिश्चंद्र म्हणून पृथ्वीवर राजा हरिश्चंद्राची ओळख होती. भगवान राजा हरिश्चंद्र हे श्रीराम प्रभूंचे पूर्वीचे आठवे वंशज म्हणून ओळखले जाते. राजा हरिश्चंद्रांची अशी कीर्ती केली होती की, आपलं संपूर्ण आयुष्य स्वप्नामध्ये दान देऊन ते सत्यात उतरवण्याचं काम राजा हरिश्चंद्रांनी केलं होतं. स्वतःचे कपडे दागिने व असलेले राज्य राजा हरिश्चंद्र दान केलं होतं आणि सर्व दान देऊन राजा हरिश्चंद्र काशीला निघून गेले होते; म्हणून या राज्याची ख्याती जग विख्यात आहे. या मंदिराचा इतिहास सांगायचा म्हटलं तर, सर्वात पहिल्यांदा भगवान बाबांनी या ठिकाणी, तीर्थक्षेत्राची ओळख केली आणि थोडासा विकास केला, त्यानंतर आता नामदेव शास्त्री यांनी याचा विकास करत आहेत. आणि भगवान महाराज राजपूत यांनी या ठिकाणी राजा हरिश्चंद्राच्या ट्रस्टची स्थापना करून; मंदिराचा विकास करत आहेत.



दक्षिण मुखी शिवलिंग : ज्यावेळेस भगवान बाबांना या शिवलिंगाचा उद्धार करायचा होता. त्यावेळेस भगवान बाबांनी ही पिंड फिरवण्यासाठी खोदकाम केले जवळपास ते अकरा फूट खोदकाम केले. मात्र हे खोदकाम केले असता जसजसं खाली खड्डा खोदत गेले तसतसं या पिंडीचा आकार मोठा होत चालल्याचं भगवान बाबाच्या निदर्शनास आलं आणि त्याच रात्री भगवान बाबांना दृष्टांत झाला व स्वप्नात येऊन सांगितलं की, मी अनंत आहे. आपण जिथपर्यंत खोदकाम कराल, तिथपर्यंत ही पिंड मोठी मोठी होत जाणार आहे. त्यामुळे आपण खाली खोदकाम करू नये. असे भगवान बाबांना स्वप्नामध्ये येऊन सांगितल्यानंतर, त्यांनी दुसऱ्या दिवशीच ही पिंड जशी आहे तशीच ठेवुन इतर परिसरातील खोदकान बुजवून घेतले. या शिवलिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे, हे शिवलिंग दक्षिण मुखी आहे आणि त्याच्या समोरासमोर नंदी आहे, तो नंदी आणि महादेवाची पिंड ही समोरासमोर कुठेही पाहायला मिळत नाही. राजा हरिश्चंद्राचं देशातील नव्हे, तर जगातील एकमेव मंदिर आहे. ते देशामध्येच नाही, तर जगामध्ये कुठेही नाही. तिर्थक्षेत्र काशी या ठिकाणी सुद्धा राजा हरिश्चंद्र घाट आहे. परंतु मंदिर त्या ठिकाणी नाही. राजा हरिश्चंद्र हे एक दानशूर राजा होते. जे राजा हरिश्चंद्राच्या स्वप्नात दान द्यायचे ते सकाळी सत्यामध्ये उतरवायचे. राजा हरिश्चंद्र यांची कीर्ती द्वापार काळापासून आजही आहे.

हेही वाचा : Pradosh Vrat 2023 : 'या' रविवारला आहे प्रदोष व्रत, जाणून घ्या 2023 मधील संपूर्ण वर्षातील प्रदोष व्रतांची यादी

Last Updated : Mar 13, 2023, 12:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details