बीड:द्वापार युगामध्ये राजा हरिश्चंद्र हे एक दानशूर राजा म्हणून होऊन गेला. अनेक राज्य लोकांना राजा हरिश्चंद्र आणि दान केले. विशेष म्हणजे त्यांच्या स्वप्नामध्ये ज्या लोकांनी येऊन त्यांना दान मागितले ते दुसऱ्या दिवशी सकाळी सत्यामध्ये ते प्रत्यक्षात त्या व्यक्तीला दान द्यायचे. स्वप्नात दिलेले दान सुद्धा सत्यात उतरवण्याची हिंमत या राजा हरिश्चंद्रामध्ये होती.
काय आहे राजा हरिश्चंद्राची अख्खायिका: स्वर्गामध्ये एक सभा भरली होती. त्या सभेमध्ये विश्वामित्र होते. त्या सभेला अनेक देव उपस्थित होते. तसेच त्या सभेला नारद उपस्थित राहिले. नारदाला विचारले की, तुम्ही या ठिकाणी येण्याचे प्रयोजन काय, तुम्ही कुठून आलात, त्यावेळेस त्याने सांगितले की, मी मृत्यू लोकातून आलो आहे. राजा हरिश्चंद्रासारखा तत्वशिल राजा नाही, ते नारद बोलले ते विश्वामित्राला सहन झाले नाही. विश्वमित्र मृत्यू लोकात आले आणि या ठिकाणी पोहोचले, आणि मग आपण काय केले पाहिजे. हे विश्वमित्राच्या लक्षात येईना मग थोडा विचार करून त्याच्या लक्षात आले की, आपण आता मायावी पक्षी म्हणून अयोध्यामध्ये पाठवायचे. मग त्यांनी ते मायावी पक्षी बनवून अयोध्यामध्ये पाठवले. त्यामध्ये लांडगा वाघ सिंह प्राणी आहेत. ते त्यांनी मायावी पक्षी बनवून अयोध्येला पाठवले, आणि त्या ठिकाणी पशुपक्षी पाहून अयोध्येतील जनता घाबरली व राजाला सांगितले की, मायावी पक्षी या ठिकाणी आलेले आहेत. वाघ सिंह आलेले आहेत आणि लोकांना मारत आहेत, आणि मग राजाने हे मायावी प्राणी कुठून आले आहेत. त्याचा माग काढत आजच्या हरिश्चंद्र पिंपरी ठिकाणी आले.
ब्राह्मणाला बायको व मुलगा विकला: हरिचंद्र राजाबरोबर प्रधान आणि दोन शिपाई असे चार जण या ठिकाणी आले. रात्री मुक्काम केला आणि रात्री झोपले व राजा हरिश्चंद्राला एक स्वप्न पडले की, त्या स्वप्नामध्ये विश्वमित्र राजा हरिश्चंद्रला राज्य दान मागायला आलेल्या आहेत. त्यावेळेस राजा हरिश्चंद्राने विश्वामित्राला दान दिले. सकाळी प्रत्यक्षात विश्वमित्र राजा हरिश्चंद्रला दान मागायला आला. विश्वमित्राने सर्व खजिन्याच्या चाव्या मागितल्या. हरिश्चंद्र राजा विश्वमित्राला म्हणाला चला अयोध्येला मी तुम्हाला राज्य दान देतो. मग ते या ठिकाणावरून अयोध्येला गेले. अयोध्येला गेल्यानंतर राजा हरिश्चंद्र सांगितले की, यांना जे मागेल ते द्या. मग विश्वमित्र मनाला हे मला असले काही नको, मला तुझ्या डोक्यावरचा मुकुट हवा आहे. या सगळ्या खजिन्याच्या चाव्या मला पाहिजे आहेत. राजा हरिश्चंद्र हो बोलला व आठ दिवसाचा करार केला. राज्याच्यावर तीन भार सोने द्या मग राजा हरिश्चंद्र तीन भार सोने देण्यासाठी ते काशीला गेले. त्या ठिकाणी ब्राह्मणाला आपली बायको व मुलगा विकला.