बीड-बीड जिल्ह्यातील महसूल विभागाची लाचखोरी पुन्हा समोर आली आहे. वडवणी तहसीलदाराने अवैध वाळू वाहतूक करताना पकडलेला ट्रॅक्टर सोडण्यासाठी, 30 हजार रुपयांची लाच घेताना तहसीलदार, तलाठी व कोतवाल यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून बुधवारी रंगेहात पकडले आहे.
वाळूचे ट्रॅक्टर सोडण्यासाठी तीस हजारांची लाच घेताना तहसीलदाराला अटक
बीड जिल्ह्यातील महसूल विभागाची लाचखोरी पुन्हा समोर आली आहे. वडवणी तहसीलदाराने अवैध वाळू वाहतूक करताना पकडलेला ट्रॅक्टर सोडण्यासाठी, 30 हजार रुपयांची लाच घेताना तहसीलदार, तलाठी व कोतवाल यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून बुधवारी रंगेहात पकडले आहे.
वडवणी येथील तहसीलदार श्रीकिसन देवराव सांगळे, तलाठी धुराजी कचरू शेजाळ व कोतवाल बाळू आनंत बिडवे अशी लाचखोरांची नावे आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, बुधवारी वडवणी जवळील वाळू पट्टयामधून एक ट्रॅक्टर अवैध वाळू वाहतूक करत होते. हे ट्रॅक्टर तहसीलदारांनी आडवले त्यानंतर तहसीलदारांनी वाळू माफिया बरोबर तडजोड केली. यामध्ये अधिकाऱ्यांनी 30 हजार रुपयांची मागणी केली. दरम्यानच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारदाराच्या तक्रारीवरून सापळा रचला होता. यामध्ये तहसीलदार, तलाठी व कोतवाल हे तिघेही लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. त्यामुळे बीड जिल्ह्यातील महसुल विभागाची लक्तरे वेशीला टांगली आहेत.