बीड- शहरातील बालेपीर भागात बीड-नगर मार्गावर एका 35 वर्षीय सहशिक्षकाचा खून झाल्याची घटना गुरुवारी दुपारी 3 वाजता घडली. खून झालेल्या शिक्षकाने 2 महिन्यापूर्वी संबंधित पोलीस ठाण्यात जीवाला धोका असल्याची तक्रार दिली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. यामध्ये तिघांनी खून केल्याचा पोलिसांनी प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.
हेही वाचा - दत्तक घेतलेल्या 'धसवाडी' गावात 5 वर्षात एकदाही गेल्या नाहीत मंत्री पंकजा मुंडे... पाहा परिस्थिती
सय्यद साजिद अली, असे खून झालेल्या 35 वर्षीय शिक्षकाचे नाव आहे. बीड शहरातील बालेपीर येथील रहिवासी सय्यद साजिद अली हा एका सैनिकी विद्यालयात सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे. गुरुवारी नमाज पडून हॉटेलमध्ये चहा घेत असताना त्याचा खून करण्यात आला. जुन्या वादातून कुकरीने वार करत आरोपींनी सय्यद अलीची हत्या केली.