बीड- जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यामधील मुगगाव परिसरात अचानक डझनभर कावळे मृतावस्थेत आढळून आले आहेत. सध्या बर्ड फ्लूची भीती असल्याने कावळ्यांच्या मृत्यूमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. पशू वैद्यकीय विभागाने मृतावस्थेत आढळलेल्या कावळ्यांच्या मृत्यूचे कारण जाणून घेण्यासाठी मृत कावळ्यांचे मास प्रयोगशाळेकडे पाठविले आहे, अशी माहिती पशुवैद्यकीय अधिकारी विजय देशमुख यांनी दिली.
चौकशी होणे गरजेचे
या कावळ्यांचा मृत्यू कशामुळे होत आहे. याची चौकशी होणे देखील गरजेचे असल्याचे पक्षी तथा प्राणी मित्र सिध्दार्थ सोनवणे यांनी म्हटले आहे.
शवविच्छेदन अहवालानंतर उलगडणार कावळ्यांच्या मृत्यूचे रहस्य