बीड - अंबाजोगाई येथील रूद्रवार दाम्पत्याचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू झाला त्यांचा सोबत त्यांची चार वर्षाची मुलगी विहा अमेरिकेत राहात होती. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी पाठपुरावा करून मुलीचा ताबा अंबाजोगाई येथील रुद्रवार कुटुंबाकडे दिला आहे.
सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून याबाबतची माहिती दिली. त्यांनी ट्विटरवर लिहिलंय, ''महाराष्ट्रातील अंबाजोगाई येथील रुद्रवार दांम्पत्याचा न्यू जर्सी, अमेरिका येथे संशयास्पद मृत्यु झाल्यानंतर तेथील न्यायालयाने त्यांच्या ४ वर्षांच्या लहान मुलीचा ताबा भारतातील रुद्रवार कुटुंबियांकडे दिला.परक्या मुलूखात माता-पित्याचे छत्र हरविलेल्या या मुलीला पुन्हा मायेचे छत्र मिळाले.''