बीड - परळी शहरात सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास नुकत्याच जन्मलेल्या स्त्री जातीच्या अर्भकाला रेल्वे रुळाजवळ काटेरी झुडुपात टाकून दिल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला होता. या घटनेतील पीडित मुलीचे पालकत्व खासदार सुप्रिया सुळेंसह परळीचे आमदार आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वीकारले.
सुप्रिया सुळे, धनंजय मुंडेंनी स्वीकारले 'नकोशी'चे पालकत्व; 'हे' ठेवले नाव
धनंजय मुंडे त्या मुलीच्या उपचाराचा संपूर्ण खर्च उचलणार आहेत. प्रकृती सुधारताच तिला पुण्यातील सर्व सोयीयुक्त बालिकाश्रमात हलवण्यात येणार आहे. या मुलीचे संगोपन, शिक्षण आणि लग्नाची जबाबदारी देखली सुप्रिया सुळे आणि धनंजय मुंडे यांनी स्वीकारली आहे.
सुप्रिया सुळे, धनंजय मुंडेंनी स्वीकारले 'नकोशी'चे पालकत्व; 'हे' ठेवले नाव
हेही वाचा -'साहेब कर्ज फिटलं... आता लेकीच्या लग्नाला या...'
महाशिवरात्रीदरम्यान हा प्रकार घडल्याने या मुलीचे 'शिवकन्या' असे नामकरण करण्यात आले. मुलीच्या उपचाराचा संपूर्ण खर्च मुंडे उचलणार आहेत. प्रकृती सुधारताच तिला पुण्यातील सर्व सोयीयुक्त बालिकाश्रमात हलविण्यात येणार आहे. या मुलीचे संगोपन, शिक्षण आणि लग्नाची जबाबदारीदेखली सुप्रिया सुळे आणि धनंजय मुंडे यांनी स्वीकारली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत.