बीड -शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सहा वाजता घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या जवळ एक सुसाइड नोट सापडली असून जळगावच्या एका मुलीकडून सतत ब्लॅकमेलिंग केले जात असल्याचे पोलीस सूत्रांची प्राथमिक माहिती आहे.
हेही वाचा -माजलगाव नगरपालिकेत १ कोटी ६१ लाखांचा अपहार; तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांसह तिघांवर गुन्हा दाखल
दिलीप प्रकाश केंद्रे असे आत्महत्या केलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. या घटनेबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी आहे की दीड महिन्यापूर्वी केंद्रे जळगाव येथून बदलून बीड येथे आले होते. ते शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास बीड शहरातील धांडेनगर परिसरामध्ये त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेने बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या सहा महिन्यापासून केंद्रे हे अस्वस्थ होतो. शिवाजीनगर पोलीस पुढील तपास करत आहेत.