बीड-घराजवळ राहणाऱ्या तरुणाने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा सतत पाठलाग करून तिला त्रास दिला. हा त्रास असह्य झाल्याने त्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सायंकाळी बीड जिल्ह्यातील परळी शहरातील सावतामाळी नगर येथे उघडकीस आली. याप्रकरणी त्या रोडरोमिओवर विनयभंग व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
परळी शहरातील सावतामाळी नगर भागात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या घराजवळ राहणारा मंगेश भास्करराव कोपनबैने (२९) हा तरुण तिला मागील वर्षभरापासून सतत त्रास देत होता. मंगेश नेहमी तिचा पाठलाग करून बोलण्यासाठी आग्रह धरत होता तसेच मोबाईल नंबर मागून तिची छेड काढत होता. हा सततचा त्रास असह्य झाल्याने तिने अखेर गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली, असे तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून मंगेश कोपनबैनेविरूद्ध संभाजीनगर पोलीस ठाण्यात कलम ३०६, ३५४ (ड) यासह पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात असून त्याला अटक करण्यात आली आहे.
सततच्या छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या; परळी येथील घटना - beed minor girl suicide news
घराजवळ राहणाऱ्या तरुणाच्या सततच्या त्रासाला कंटाळून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याचा प्रकार बीड येथे घडला आहे.
सततच्या छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या; परळी येथील घटना
Last Updated : Nov 20, 2020, 4:58 AM IST