बीड -जिल्ह्यातील कामखेडा येथील एका विद्यमान ग्रामपंचायत सदस्याने कर्जबाजारीपणामुळे ८ दिवसापूर्वी विष पिले होते. त्याच्यावर बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आज (शनिवारी) उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. बबन दादाराव ढोले असे या व्यक्तीचे नाव आहे.
बीडमध्ये कर्जबाजारीपणाचा बळी, ग्रामपंचायत सदस्याची विष पिऊन आत्महत्या - Baban dadarao dhole
बीडमध्ये ग्रामपंचायत सदस्याने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली आहे.
![बीडमध्ये कर्जबाजारीपणाचा बळी, ग्रामपंचायत सदस्याची विष पिऊन आत्महत्या](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4033686-thumbnail-3x2-sucide.jpg)
बबन यांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ८ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते, अखेर शनिवारी त्यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांची प्राणज्योत मावळली.
बबन हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. दुष्काळी परिस्थिती असल्याने त्यांनी छावणी चालवायला घेतली होती. यासाठी त्यांनी व्याजाने पैसे काढले होते. ते पैसे परत करण्याच्या तणावातून त्यांनी विष पिऊन आत्महत्या केली असल्याची चर्चा आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.