महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 9, 2020, 8:31 PM IST

ETV Bharat / state

बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय प्रकरण : सुदाम मुंडेच्या चौकशीत अद्यापही मिळाले नाहीत ठोस पुरावे

येत्या शुक्रवारी पुन्हा सुदाम मुंडेला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, पोलिसांनी त्याची मुलगी प्रियदर्शनी मुंडे आणि सोनोग्राफी सेंटर चालकाचा जवाब नोंदवला आहे. अवैध गर्भपात आणि गर्भलिंग चाचणी प्रकरणात दहा वर्षांची शिक्षा भोगत असलेल्या सुदाम मुंडे याला न्यायालयाने जामीन दिल्यानंतर त्याने परळी येथील रामनगर परिसरामध्ये शेतात दवाखाना उघडला.

sudam munde (file photo)
सुदाम मुंडे (संग्रहित)

बीड - अवैध गर्भपात प्रकरणातील आरोपी सुदाम मुंडे याला बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय प्रकरणात परळी न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडीत सुनावली आहे. बुधवारी तिसऱ्या दिवशीपर्यंत पोलिसांना डॉ. सुदाम मुंडे यांच्याकडून ठोस पुरावे सापडलेले नाहीत.

येत्या शुक्रवारी पुन्हा सुदाम मुंडेला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, पोलिसांनी त्याची मुलगी प्रियदर्शनी मुंडे आणि सोनोग्राफी सेंटर चालकाचा जवाब नोंदवला आहे. अवैध गर्भपात आणि गर्भलिंग चाचणी प्रकरणात दहा वर्षांची शिक्षा भोगत असलेल्या सुदाम मुंडे याला न्यायालयाने जामीन दिल्यानंतर त्याने परळी येथील रामनगर परिसरामध्ये शेतात दवाखाना उघडला. याची माहिती मिळताच, जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार आरोग्य विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सुदाम मुंडेला अटक केली.

न्यायालयाने त्यास पाच दिवसाची पोलीस कोठडी दिली होती. कोठडीत असताना सुदाम मुंडे हा पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत आहे. या दवाखान्यांमध्ये कोऱ्या चिठ्ठीवर औषध लिहिली जायची. त्यामुळे औषधी लिहिलेली त्याचे नाव असलेली वा रजिस्ट्रेशन असलेली प्रिस्क्रिप्शन पोलिसांना अद्याप सापडलेले नाही. या कोऱ्या चिठ्ठीवरच मेडिकलमधून औषधे दिली जात होती. तसेच दवाखान्यामध्ये कोणी उपचार घेतले किती रुग्णावर उपचार केले गेले, याची कुठलीही ठोस माहिती पोलिसांच्या हाती लागलेली नाहीत.

या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत त्याची मुलगी प्रियदर्शनी आणि एका सोनोग्राफी सेंटर चालकाचा जवाब नोंदवला आहे.

कोण आहे सुदाम मुंडे?

बीड जिल्ह्यातील स्त्रीभ्रूण हत्येच्या घटनांनी 8 वर्षांपूर्वी राज्यात खळबळ माजली होती. यातील प्रमुख ‘कलाकार’ असलेल्या परळीच्या डॉ. सुदाम मुंडेला विजयमाला पाटेकर या महिलेच्या बेकायदा गर्भपात आणि मृत्यू प्रकरणात 10 वर्षाची शिक्षा झाली होती, तर महाराष्ट्र वैद्यक परिषदेने (एमसीआय) त्याचा वैद्यकीय व्यवसायाचा परवाना रद्द केला होता. 10 वर्षांची शिक्षा झालेला सुदाम मुंडे काही महिन्यांपूर्वी जामिनावर बाहेर आला होता. जामिनावर बाहेर आल्यानंतर सुदाम मुंडेने परळी तालुक्यातील रामनगर भागात बेकायदा दवाखाना थाटला होता. याची तक्रार जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना मिळाल्यानंतर त्यांनी बोगस डॉक्टर शोध समितीकडे प्रकरण पाठवून कारवाईचे निर्देश दिले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details