बीड- कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. राज्यामध्ये संचारबंदीचे उल्लंघन करून घराबाहेर निघणाऱ्यांना पोलिसांकडून समज देण्यात येत आहे, तसेच काहींची वाहने देखील जप्त केली जात आहेत. जप्त केलेल्या वाहनांमुळे कोरोना विषाणूची लागन होऊ नये, यासाठी शहर पोलिसांनी काल या वाहनांचे निर्जंतुकीकरण केले, अशी माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांनी दिली.
बीडमध्ये पोलिसांच्या वाहनांसह संचारबंदीदरम्यान पकडलेल्या दुचाकींचे होताहेत निर्जंतुकीकरण - beed city police
पोलिसांनी संचारबंदी आदेशाची पायमल्ली करणाऱ्या काही नागरिकांच्या दुचाकी जप्त केल्या असून त्यांचे निर्जंतुकीकरण केले आहे. तसेच गस्तीवर असलेल्या पोलीस वाहनांचे देखील निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.
निर्जंतुकीकरण
कुठल्याही परिस्थितीत जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, यासाठी पोलिसांनी खबरदारीची पाऊले उचलले आहे. पोलिसांनी संचारबंदी आदेशाची पायमल्ली करणाऱ्या काही नागरिकांच्या दुचाकी जप्त केल्या असून त्यांचे निर्जंतुकीकरण केले आहे. तसेच गस्तीवर असलेल्या पोलीस वाहनांचे देखील निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.
Last Updated : Mar 29, 2020, 1:18 PM IST