महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खासदार संजय काकडेंचे वक्तव्य; बीड भाजपकडून तीव्र निषेध - Heavy protests against sanjay kakde by bjp in beed

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी संजय काकडे यांना मोठे केले. काकडेंना ओळख मुंडेंनी दिली. मात्र, रात्री एक आणि सकाळी एक अशी बोलायची सवय काकडे यांना आहे. खासदारकीची उमेदवारी मागण्यासाठी दारोदारी फिरतात. सगळय़ा डगरींवर हात ठेवणारे संधी साधू आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया भाजपच्या महिला पदाधिकारी संगीता धसे यांनी दिली.

Statement by MP Sanjay Kakade; Heavy protests against sanjay kakde by bjp in beed
खासदार संजय काकडेंचे वक्तव्य; बीड भाजपडून तीव्र निषेध

By

Published : Dec 14, 2019, 10:06 AM IST

बीड - भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याविरोधात खासदार संजय काकडे यांनी शुक्रवारी वक्तव्य केले होत. यावरून पंकजा यांच्या समर्थकांनी खासदार काकडे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी काकडेंच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. दोन डगरीवर हात ठेवणारे संजय काकडे संधी साधू आहेत, त्यांचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो, अशी संतप्त प्रतिक्रिया भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी व्यक्त केली.

खासदार संजय काकडेंचे वक्तव्य; बीड भाजपडून तीव्र निषेध

हेही वाचा - रामलीला मैदानावर आज काँग्रेसची ‘भारत बचाओ रॅली’

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी संजय काकडे यांना मोठे केले. काकडेंना ओळख मुंडेंनी दिली. मात्र, रात्री एक आणि सकाळी एक अशी बोलायची सवय काकडे यांना आहे. खासदारकीची उमेदवारी मागण्यासाठी दारोदारी फिरतात. अजित पवार यांना भेटतात. सगळ्या डगरींवर हात ठेवणारे संधी साधू आहेत. संजय काकडेंनी आत्मपरीक्षण करावे आणि त्यांच्या मर्यादेत रहावे, अशी संतप्त प्रतिक्रिया भाजपच्या महिला पदाधिकारी संगीता धसे यांनी दिली. यावेळी मोठय़ा संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details