श्रीक्षेत्र कपिलधार येथे कार्तिक पौर्णिमा बीड Kartik Purnima 2023 :बीड जिल्हा हा संतांची भूमी म्हणून ओळखला जातो. संत महादेव बाबा, संत भगवान बाबा, संत वामन भाऊ, संत ज्ञानेश्वर माऊली यासारखे अनेक संत जिल्ह्यात होऊन गेले. अनेक वर्षाचा कालखंडामध्ये त्यांनी कीर्ती केली. महाराष्ट्रामध्ये दोन संत असे होऊन गेले की, त्यांनी संजीवन समाधी घेतली. 'संत ज्ञानेश्वर' (Sant Dnyaneshwar) आणि 'संत मन्मथ स्वामी' (Manmath Swami) या दोन संतांनी महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जिवंत समाधी घेतली आहे. मन्मथ स्वामी यांची 459 वर्षां पासून कार्तिक पौर्णिमेला या ठिकाणी मोठी यात्रा भरते. या ठिकाणी लिंगायत समाजाचे श्रद्धास्थान म्हणून 'श्रीक्षेत्र कपिलधार' महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये ओळखले जाते.
459 वर्षांपूर्वी श्री मन्मथ स्वामी यांचा जन्म: जगाला पवित्र करण्याचे सामर्थ्य या वीरशैव कुळामध्ये आहे. त्याच कुळामध्ये 459 वर्षांपूर्वी श्री मन्मथ स्वामी (Manmath Swami) यांचा जन्म बीड जिल्ह्यातील नेकनूर या गावी मनमत स्वामी यांच्या आई पार्वती आणि वडील शिवलिंग स्वामी यांच्या पोटी जन्म झाला. मन्मथ स्वामी यांचा जन्म दिनोदर बाबा यांच्या आशीर्वादाने झाला होता.
काय आहे या ठिकाणची आख्यायिका :या ठिकाणी कपिल मुनी यांचं वास्तव्य होतं. कपिल मुनी यांची गंगासागर येथे समाधी आहे. कपिल मुनी हे तपस्वी असल्यामुळे त्यांनी हे क्षेत्र दिनोदर बाबा यांच्या ओटीमध्ये टाकलं म्हणजे त्यांना दान केलं. दिनोदर बाबा हे एक तपस्वी महाराज होते. ते या ठिकाणी असलेल्या पंचकुंडाच्या ठिकाणी गुप्त झाले. त्याअगोदर दिनोदर बाबा यांनी हे तीर्थक्षेत्र मन्मथ स्वामी यांना स्वाधीन केलं होतं. मन्मथ स्वामी यांनी या ठिकाणी तपश्चर्या करून वयाच्या 26 व्या वर्षी संजीवन समाधी घेतली. या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात. या ठिकाणी अनेक भाविक राज्यातूनच नव्हे तर इतर राज्यातून देखील मोठ्या प्रमाणातून दाखल होतात.
जिवंत संजीवनी समाधी घेणारे महाराष्ट्रातील दुसरे संत: मन्मथ स्वामी यांची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलधार या ठिकाणी गेले. 459 वर्षापासूनची ही परंपरा व लिंगायत समाजाचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी यात्रेमध्ये लाखो भाविक भक्तमोठ्या प्रमाणात येतात. जिवंत संजीवनी समाधी घेणारे हे महाराष्ट्रातील दुसरे संत म्हणून ओळखले जातात. मन्मथ स्वामी यांनी 'परम रहस्य' हा ग्रंथ या कपिलधार या ठिकाणी लिहिला. त्यावेळी त्याठिकाणी दुसरं प्राणी देखील वास्तव्यास होते. अनेक वाघ, सिंह, साप या ठिकाणी वास्तव्य होते. ज्यावेळी मन्मथ स्वामी त्या ठिकाणी तपश्चर्या करत असत त्यावेळी त्यांच्या अंगा खांद्यावर साप खेळत असत असा त्यांचा अनेक वर्षापासूनचा इतिहास आहे. अनेक भागातून दिंड्या या ठिकाणी येतात आणि सर्व समाज एकत्र करून एक विचार या ठिकाणावरून घेऊन जातात.
यंदा मुख्यमंत्री शिंदे शासकीय महापूजा: राज्यातील अनेक भागातून 70 पेक्षा जास्त दिंड्या या ठिकाणी येतात. या ठिकाणी कार्तिक पौर्णिमेला माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख आणि उपमुख्यमंत्री दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी पहिली शासकीय पूजा पंधरा वर्षा पूर्वी केली होती. त्यानंतर यावर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे शासकीय महापूजा करणार आहेत. त्यामुळं या ठिकाणी एक आगळ वेगळं महत्व या कपिलधार तिर्थक्षेत्राला लाभले आहे. हा परिसर अत्यंत निसर्गरम्य ठिकाणी आहे. त्यामुळं येणारा प्रत्येक भाविक या ठिकाणी मंत्रमुग्ध होतो.
हेही वाचा -
- श्रावणमास विशेष : उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराच्या सरळ रेषेमध्ये आहे जालन्यातील भोलेनाथाचे देवस्थान
- Navratri 2023: बीडच्या खंडेश्वरी माता मंदिरात नवरात्रोत्सव उत्साह; दर्शनासाठी भाविकांची गर्दी...पाहा व्हिडिओ
- Bull Fight Competition In Samnapur: समनापूर गावात दिवाळी पाडव्याला रेड्यांची टक्कर स्पर्धा, कार्यक्रमाला हजारो लोकांची गर्दी