महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कुटुंबाबरोबरच स्वीकारलेला रुग्णसेवेचा वसा आम्हाला विसरता येणार नाही

कोरोना काळात सामाजिक, वैद्यकीय, सरकारी तसेच अन्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या कोरोना मर्दिनींचे योगदान 'ईटीव्ही भारत' वाचकांसमोर आणत आहे. या भागात बीडच्या रुग्णालयात महामारीची परिस्थिती हाताळणाऱ्या परिचारिकांंबद्दल जाणून घेऊ...

beed corona news
कुटुंबाबरोबरच स्वीकारलेला रुग्णसेवेचा वसा आम्हाला विसरता येणार नाही!

By

Published : Oct 17, 2020, 6:48 AM IST

Updated : Oct 17, 2020, 2:16 PM IST

बीड - शनिवारपासून संपूर्ण देशभरात नवरात्र उत्सव सुरू होत आहे. नवरात्र उत्सव म्हणजे दुर्गेचे प्रतीक! दुर्गेने अनेक राक्षसांचा संहार केला. सध्या महामारीच्या परिस्थितीत परिचारिकांचा लढा राक्षस रुपी कोरोनाशी आहे. 'ईटीव्ही भारत'च्या विशेष कार्यक्रमातून जाणून घ्या नवरात्रीच्या नवदुर्गांबाबत...

कुटुंबाबरोबरच स्वीकारलेला रुग्णसेवेचा वसा आम्हाला विसरता येणार नाही

मागील सहा महिन्यांपासून आम्ही कोविड वार्डात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची सेवा करत आहोत. ज्या ठिकाणी रुग्णांचे नातेवाईक संसर्गाच्या भीतीने येण्याचं टाळतात, त्या ठिकाणी आम्ही परिचारिका काम करतोय. परिचारिकेची नोकरी स्वीकारताना घेतलेली रुग्णसेवेची शपथ अन् वसा आम्हाला महत्त्वाचा वाटतो. कुटुंब व रुग्णसेवा करताना आम्हाला तारेवरची कसरत करावी लागते. मात्र हे आम्ही अगदी मनातून करत आहोत. अशा भावना बीड जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांनी व्यक्त केल्या.

बीड जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 11 हजार 824 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 10 हजार 18 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यातील 80 टक्के रुग्णांनी सरकारी रुग्णालयात उपचार घेतले. त्यातील अनेकजण बरेही झाले.

'रुग्णसेवा हिच ईश्वर सेवा'

कोविडच्या या सगळ्या प्रक्रियेत महत्त्वाचा घटक म्हणजे वार्डमध्ये काम करणाऱ्या परिचारिका आहेत. सध्या सुरू असलेल्या नवदुर्गा उत्सवात घरोघरी दुर्गापूजा होते. मात्र आज घडीला कोरोना वॉर्डमध्ये रुग्ण सेवेचे काम करणाऱ्या परिचारिका या देखील दुर्गावतारातच आहेत. घरची जबाबदारी सांभाळून या नवदुर्गा कर्तव्यावर रुजू होत आहेत.

कोरोनाचं ओढावलेलं संकट कधी दूर होईल, असं आम्हाला देखील वाटतंय. परिचारिका म्हणून काम करत असताना आमच्यामुळे घरातील सदस्यांना देखील कोरोना होऊ शकतो, याची सतत मनात भीती असते. पण 'रुग्ण सेवा, हीच ईश्वर सेवा' अशी भावना बीड जिल्हा रुग्णालयातील मेट्रन संगिता दिंडकर यांनी व्यक्त केली.

बरे झालेल्या रुग्णांच्या चेहऱ्यावरील आनंद महत्त्वाचा

बीड जिल्हा रुग्णालयातील कोरोना वार्डात काम करताना दररोज बरे झालेले रुग्ण आम्हाला रुग्णसेवा करण्याचे बळ देतात. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आमची उमेद वाढवतो. असे मत कोरोना वार्डात जयश्री उबाळे, वनिता वकरे, वंदना उबाळे यांनी व्यक्त केले.

Last Updated : Oct 17, 2020, 2:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details