बीडमध्ये फ्रन्टलाइन वर्कर्सच्या मदतीसाठी सरसावले समाजसेवक - लोक विकास मंच
बीड जिल्ह्यात सर्व तालुक्यामध्ये गेल्या नऊ-दहा महिन्यापासून जिल्हा प्रशासनातील वेगवेगळ्या विभागातील अधिकारी-कर्मचारी फ्रंटलाइनवर काम करत आहेत. यादरम्यान त्यांना ग्रामीण भागात जाऊन काम करावे लागते. यादरम्यान कोरोना पासून बचाव व्हावा, यासाठी ऑक्सफार्म इंडिया व मराठवाडा लोकविकास मंच जिल्हा प्रशासनाला आवश्यक तेवढ्या किट पुरवणार आहे.
बीड - जिल्ह्यात कोरोना काळात फ्रंटलाइनवर काम करणाऱ्या प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी बीड येथील मराठवाडा लोक विकास मंच व ऑक्सफार्म इंडिया या संस्था सरसावल्या आहेत. जिल्हा प्रशासनातील कर्मचाऱ्यांना कोरोना पासून बचावासाठी एक किट कर्मचारी व अधिकारी यांना दिली आहे. या किटमध्ये मास्क, गॉगल, सॅनिटायझर याशिवाय पीपीई किट मोफत देण्यात आले. कोणाच्या बिकट काळात प्रत्यक्ष काम करणार्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही हे काम करत असल्याचे ऑक्सफार्म इंडियाचे समन्वयक निखिल वाघ व मराठवाडा लोक विकास मंच जिल्हाप्रमुख ओमप्रकाश गिरी यांनी सांगितले.
यावेळी मराठवाडा लोकविकास मंचचे प्रमुख ओमप्रकाश गिरी म्हणाले, की बीड जिल्ह्यात सर्व तालुक्यामध्ये गेल्या नऊ-दहा महिन्यापासून जिल्हा प्रशासनातील वेगवेगळ्या विभागातील अधिकारी-कर्मचारी फ्रंटलाइनवर काम करत आहेत. यादरम्यान त्यांना ग्रामीण भागात जाऊन काम करावे लागते. यादरम्यान कोरोनापासून बचाव व्हावा, यासाठी ऑक्सफार्म इंडिया व मराठवाडा लोकविकास मंच जिल्हा प्रशासनाला आवश्यक तेवढ्या किट पुरवणार आहे. पहिल्या टप्प्यात बीड तालुक्यातील कर्मचाऱ्यांना या किटचे वाटप करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये फ्रंटलाइनवर काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तिचे वाटप करणार असल्याचे ओम प्रकाश गिरी म्हणाले.
जिल्ह्यात आज घडीला सहा हजारपेक्षा अधिक कोरोना सक्रिय रुग्ण आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांना ऑक्सिजन लागत आहे. या सगळ्या बिकट परिस्थितीत जिल्हा प्रशासनातील अधिकारी कर्मचारी तसेच आरोग्य विभागातील सर्व यंत्रणा गावस्तरावर जाऊन काम करत आहे. यादरम्यान अधिकारी-कर्मचार्यांच्या आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. यासाठीच ओक्सफॉर्म इंडिया व मराठवाडा लोकविकास मंचच्यावतीने किटचे वाटप करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील अकराही तालुक्यामध्ये हा उपक्रम राबवणार असल्याचे ऑक्सफार्मचे समन्वयक निखिल वाघ म्हणाले. यावेळी जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे, पसायदान सेवा प्रकल्पाचे गोवर्धन दराडे उपस्थित होते.