बीड - जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदार संघात पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी थेट बहिण विरुद्ध भाऊ लढत होणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुका शांततेत व पारदर्शक पार करायच्या असतील तर परळी येथे मागील 15 वर्षांपासून ठाण मांडून बसलेला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तत्काळ बदल्या करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते वसंत मुंडे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
परळीत 15 वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या पोलिसांच्या बदल्या करा; मुंडेची निवडणूक आयोगाकडे तक्रार - Social activist Vasant Munde
विधानसभा निवडणुकीमध्ये जुन्या पोलीस कर्मचाऱ्यांना हस्तक्षेप करू देऊ नये, असेही निवडणूक आयोगाला दिलेल्या तक्रारीत वसंत मुंडे यांनी म्हटले आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
परळी शहरात पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध धंदे देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. येणार्या निवडणुकीवर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये जुन्या पोलीस कर्मचाऱ्यांना हस्तक्षेप करू देऊ नये, असेही निवडणूक आयोगाला दिलेल्या तक्रारीत वसंत मुंडे यांनी म्हटले आहे. या निवेदनाची दखल घेऊन निवडणूक आयोग नेमका काय निर्णय घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.