महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीड : सोमवारी 6 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, बाधितांचा आकडा 18 वर - beed corona updates

जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने रविवारी 23 संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले होते. या 23 रुग्णांपैकी 6 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर, उर्वरित 17 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सोमवारी 23 पैकी आढळले 6 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
सोमवारी 23 पैकी आढळले 6 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

By

Published : Jun 8, 2020, 10:50 PM IST

बीड -येथील जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने रविवारी 23 संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले होते. सोमवारी या रुग्णांचा अहवाल प्राप्त झाला असून या 23 रुग्णांपैकी 6 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून उर्वरित 17 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

येथील जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने रविवारी 23 संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले होते. या 23 रुग्णांपैकी 6 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर, उर्वरित 17 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज घडीला बीड जिल्ह्यात एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 18 एवढी आहे. त्या 6 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये धारुर तालुक्यातील आंबेवडगाव येथील एका दहा वर्षीय मुलाचा व गेवराई तालुक्यातील मालेगाव बुद्रुक येथील एकाचा समावेश आहे. तर, 3 रुग्ण बीड शहरातील असून 1 आष्टी तालुक्यातील आहे. असे एकूण सहा रुग्ण सोमवारी पॉझिटिव्ह आले आहेत.

वरील 6 पॉझिटिव रुग्णांपैकी आष्टी तालुक्यातील एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा कोरोना चाचणी अहवाल येण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने एकूण 23 संशयितांचे स्वॅब कोरोना चाचणीसाठी पाठविले होते. आज घडीला बीड जिल्हा रुग्णालयात 18 एवढे रुग्ण उपचार घेत आहेत तर, आतापर्यंत 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details