महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 9, 2022, 10:32 AM IST

Updated : Jan 9, 2022, 7:25 PM IST

ETV Bharat / state

Beed Accident : अंबाजोगाई-लातूर रोडवर बस आणि ट्रकचा भीषण अपघात; चार ठार

जिल्ह्यातील अंबाजोगाई-लातूर रोडवर बर्दापूर जवळ नंदगोपाल डेअरी समोर आज सकाळी ८.३० वाजता लातूर – औरंगाबाद बस व ट्रकची समोरासमोर धडक झाली. यामध्ये सहा जण जागीच ठार झाले तर दहा जण जखमी आहेत. या अपघातात चार जण जागीच ठार, दोन गंभीर तर दहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Bus-Truck Accident
Bus-Truck Accident

बीड- जिल्ह्यातील अंबाजोगाई-लातूर महामार्गावर ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात झाला आहे. लातूर ते अंबाजोगाई दरम्यान असलेल्या सायगांव जवळ घडली आहे. अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर 14 जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.

बस आणि ट्रकचा भीषण अपघात

मृतामध्ये बस चालकाचा समावेश -

औरंगाबाद आगाराची (एमएच 20 बीएल 3017) क्रमांकाची बस काल रात्री लातूर आगारात मुक्कामी होती. आज रविवारी सकाळी 7:30 वाजता ही बस औरंगाबादच्या दिशेने मार्गस्थ झाली. लातूरहून 45 किमी अंतरावर असलेल्या सायंगाव येथे या बसची समोरुन येणाऱ्या ट्रकला धडक झाली. अपघात एवढा भीषण होता की, चार व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला असून 14 प्रवासी जखमी आहेत. मृतामध्ये बस चालकाचा समावेश आहे. घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी जमली होती. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

धुक्यामुळे अपघात झाल्याचा अंदाज -

अपघात इतका भीषण होता की, क्रेनच्या सहाय्याने दोन्ही वाहनांना बाजूला सारून जखमींना बाहेर काढावे लागले. दहा जखमींवर अंबाजोगाईच्या स्वाराती रूग्णालयात उपचार सुरू आहे. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी थंडीचे दिवस असल्याने धुके दाट होती. त्यामुळे समोरुन येणारा ट्रक चालकाला वेळीच दिसला नसावा आणि समोरासमोर धडक झाली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच लातूर विभागाचे एक पथक घटनास्थळी पाठवण्यात आले असल्याचे लातूर विभागाचे नियंत्रक सचिन क्षिरसागर यांनी 'ईटीव्ही भारत'ला दुरध्वनीवरुन सांगितले आहे.

अपघातातील मृतांची नावं -

  • अदिल सलीम शेख (वय 29, रा. अंबाजोगाई)
  • चंद्रशेखर मधुकर पाटील (वय 36, रा. कांचनवाडी, औरंगाबाद)
  • नलिनी मुकुंदराव देशमुख (वय 72, रा. औरंगाबाद)

अपघातातील जखमींची नावं -

  • सुंदरराव ज्ञानोबा थोरात (वय 50, पांगळी)
  • हरिनाथ रघुनाथ चव्हाण (वय 67, लातूर)
  • अल्लादिन आमीर पठाण (वय 20, निलंगा)
  • अकमत फाहिम पठाण (वय 38, लातूर)
  • जियान फाहिम पठाण (वय 10, लातूर)
  • भागवत निवृत्ती कांबळे (वय 55, लातूर)
  • योगिता भागवत कदम (वय 40, लातूर)
  • संगिता बजरंग जोगदंड (वय 44, लातूर)
  • दत्तगीर आयुब पठाण (वय 19, निलंगा)
  • प्रकाश जनार्दन ठाकूर (वय 55, शेंडी)
  • सुभाष भगवान गायकवाड (वय 43, पिंपळगाव)
  • आयम फाहिम पठाण (वय 13, लातूर)
  • माधव नरसिंहराव पठारे (वय 65, जालना)
  • बळीराम संभाजी कराड (वय 22, खोडवा सावरगाव)

हेही वाचा -Corona wave in Mumbai : मुंबईत तीन दिवसात रोज २० हजारावर रुग्ण, 104 पोलीस रुग्णालयात

Last Updated : Jan 9, 2022, 7:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details