महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सुरेश नवलेंसह सिराज देशमुखांचा राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा - संदीप क्षीरसागर

बीड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे यावेळी सुरेश नवले म्हणाले. बीड जिल्ह्यात काँग्रेसला एकही जागा सुटली नाही. याची खंत जरी असली तरी आम्ही आघाडीचा धर्म पाळणार, असा विश्वास यावेळी सुरेश नवले व सिराज देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

सुरेश नवले

By

Published : Oct 7, 2019, 12:00 PM IST

बीड - बीड जिल्ह्यात काँग्रेसला एकही जागा सुटली नाही याची खंत आहे, मात्र बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देणार, अशी भूमिका काँग्रेसचे माजी आमदार सुरेश नवले आणि सिराज देशमुख यांनी रविवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. बीड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे यावेळी सुरेश नवले म्हणाले.

सुरेश नवले

हेही वाचा -विधानसभा निवडणूक : बीड जिल्ह्यातील 202 उमेदवारांचे 270 उमेदवारी अर्ज वैध

पत्रकार परिषदेदरम्यान बीड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप क्षीरसागर, माजी आ. सिराज देशमुख यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना माजी आमदार सुरेश नवले म्हणाले की, देशाच्या राजकारणातील महत्त्वाची व्यक्ती असलेले शरद पवार यांच्यावर 'ईडी'चा गुन्हा दाखल करून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न भाजपकडून झाला. हा प्रकार निंदनीय आहे. याचा आम्ही निषेध करून बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला बरोबर ठामपणे उभे राहणार आहोत. बीड जिल्ह्यात काँग्रेसला एकही जागा सुटली नाही. याची खंत जरी असली तरी आम्ही आघाडीचा धर्म पाळणार, असा विश्वास यावेळी सुरेश नवले व सिराज देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details