महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Beed News: गाळमुक्त धरण कामातून अनेक तलाव घेणार मोकळा श्वास

बीड जिल्हात नदी खोलीकरण आणि रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी लोक गावात श्रमदान करत आहेत. राजकीय पुढार्‍यांना कामांमध्ये आर्थिक हातभार लावावा अशीच मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे. तर नाम फाउंडेशनच्या वतीने गावात काम सुरू करण्यात आले आहे.

By

Published : Apr 1, 2023, 3:18 PM IST

Shramdan for silt-free dam
गाळमुक्त धरणसाठी श्रमदान

बीड: दुष्काळी जिल्हा म्हणून बीडला ओळखले जाते. याच जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात लोक ऊस तोडणीसाठी जातात. त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये सिंचनाच्या सुविधा नसल्यामुळे हजारो हेक्टर जमीन कोरडवाहू आहे. यामुळे या जमिनीत एकच पीक घेता येते. यासाठी जिल्ह्यातील गावकऱ्यांनी एकत्र येऊन गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



लोकांनी केले श्रमदान :तालुक्यातील केतुरा या गावामध्ये पाणी फाउंडेशनच्या व गावातील नागरिकांच्या सहकार्याने गावामध्ये पाणी आडवा पाणी जिरवा, त्याचबरोबर नदी खोलीकरण आणि रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. या ठिकाणचे लोक श्रमदान करत आहेत. गाव पाणीदार करण्यासाठी नदी, तलावमधील गाळ काढला तर वाहून जाणाऱ्या पाण्याची साठवणूक होईल. त्याचबरोबर त्याच गाळाने जमीन सुपीक करता येईल. या गावातील अनेक लोक शेतीला पाणी नसल्यामुळे ऊस तोडणीसाठी जातात. हे टाळण्यासाठी सर्व गावकऱ्यांनी मिळून काम हाती घेतले आहे. तसेच राजकीय पुढार्‍यांनीही कामांमध्ये सहकार्य करावे. त्याचबरोबर आर्थिक हातभार लावावा अशीच मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे.


खासदारांनी मदत करावी : पाण्यासाठी सर्व गावकऱ्यांनी संकल्प केला की, गावातील असलेले बंधारे, नदी, ओढे हे रुंदीकरण आणि खोलीकरण करून वाहून जाणारे पाणी गावातच अडवायचे आणि मुरवायचे. प्रत्येक शेतकऱ्याने या मशीनमध्ये डिझेल टाकायचे होते. परंतु उत्पादित केलेला कापूस भाव नसल्यामुळे घरामध्ये तसाच पडून आहे. तरीही आम्ही प्रयत्न करत आहोत. शासनाला विनंती आहे की, जिल्ह्यातील खासदार, आमदार, मंत्री त्यांनी सर्वांनी मिळून थोडी मदत केली तर, आमची मुले बाळ तरी ऊस तोडायला जाणार नाहीत.

गाळयुक्त शिवार गाळमुक्त धरण : गावांमध्ये जवळपास दहा ते पंधरा बंधारे आहेत. गेल्या 20 वर्षापासून बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे. अनेक बंधारे गाळाने भरलेले आहेत. त्यामुळे हा गाळ काढण्यासाठी शासनाने आम्हाला मदत करावी. गावकरी सर्वजण एकत्र येऊन हे काम हाती घेतले आहे. जिल्ह्यामध्ये गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार यांच्या माध्यमातून केतुरा गावामध्ये व पोखरी गावामध्ये काम सुरू केले आहे. शेतकऱ्यांना परिसरातील तलाव नदी व बंधारे यांच्यामध्ये जो गाळ साचलेला आहे तो घेऊन जाण्यासाठी जिल्हा प्रशासन आवाहन केले आहे. तर नाम फाउंडेशनच्या वतीने हे गाळ काढण्याचे काम केले जाणार आहे.


हेही वाचा: Students Without Aadhar Card बीड जिल्ह्यातील 11 हजार 215 विद्यार्थी आधार कार्ड विना शिक्षणाऐवजी ऊसाच्या फडात कामाला

ABOUT THE AUTHOR

...view details