महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shooting at office: जमिनीच्या वादातून रजिस्ट्री कार्यालयात गोळीबार - जमिनीच्या वादातून गोळीबार

जिल्हाधिकारी कार्यालय (Collector's Office Campus) परिसरातील रजिस्ट्री कार्यालयात (In the registry office) गोळीबार होऊन दोनजण जखमी झाले आहेत.जमिनीच्या वादातून (Shooting over a land dispute) हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत सतीश क्षीरसागर यांच्या पायाला गोळी लागली तर फारुख सिद्दीकी यांच्या पायाला गोळी चाटून गेली जखमी दोघांवरही उपचार सुरू आहेत.

Shooting at office
जमिनीच्या वादातून गोळीबार

By

Published : Feb 25, 2022, 1:19 PM IST

बीड:जमिनीच्या वादातून सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या रजिष्ट्री कार्यांलयात गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत सतीश क्षीरसागर यांच्या पायाला गोळी लागली तर फारुख सिद्दीकी यांच्या पायाला गोळी चाटून गेल्या मुळे हे दोघे जखमी झाले. दोघांवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणात गोळीबार करणारे कोण होते, कोणत्या जमिनीचा वाद होता. याबाबत तपास सुरु असल्याचे पोलीस अधीक्षक आर राजा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. या प्रकरणात गोळीबार केलेल्या संशयित आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. गोळीबार करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतल्यानंतरच सगळा प्रकार समोर येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details