बीड- जिल्ह्यातील केज विधानसभा मतदारसंघ हा कायम पुरोगामी विचाराचा राहिलेला आहे. स्वर्गीय विमलताई मंदडा यांच्या विचारावर व कार्यावर विश्वास ठेवून पाच पंचवार्षिक आमदार व मंत्री म्हणून स्वर्गीय विमलताई मुंदडा यांनी केज विधानसभा मतदारसंघात काम केले आहे. अंबाजोगाई जिल्हा करण्यासाठी येथे वेगवेगळे कार्यालय व कार्यालयाच्या इमारती विमलताई मुंदडा यांच्या काळातच बांधल्या आहेत. एवढे मोठे योगदान असताना देखील 2012 नंतर आमच्याकडे एकही पक्षाचे एकही पद नाही अशी, खंत अक्षय मुंदडा यांनी भाषण करत असताना व्यासपीठावरून वरिष्ठांनसमोर बोलून दाखवली. त्यामुळे अक्षय मुंदडा यांच्या मनातील खदखद उपस्थितांना स्पष्ट जाणवली.
विमलताई मुंदडांचे जिल्ह्यासाठी योगदान असूनही पक्षाचे एकही पद नाही; अक्षय मुंदडांची खंत - केज विधानसभा मतदारसंघ
स्वर्गीय विमलताई मंदडा यांच्या विचारावर व कार्यावर विश्वास ठेवून पाच पंचवार्षिक आमदार व मंत्री म्हणून स्वर्गीय विमलताई मुंदडा यांनी केज विधानसभा मतदारसंघात काम केले आहे. मोठे योगदान असताना देखील 2012 नंतर आमच्याकडे एकही पक्षाचे एकही पद नाही अशी, खंत अक्षय मुंदडा यांनी भाषण करत असताना व्यासपीठावरून वरिष्ठांनसमोर बोलून दाखवली.
अंबाजोगाई येथे शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा झाली. यानिमित्ताने अक्षय मुंदडा व नमिता मुंदडा यांनी अंबाजोगाई शहरातून मोटारसायकल रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. यादरम्यान भाषण करताना अक्षय मुंदडा यांनी आपली खंत व्यक्त केली. स्वर्गीय विमलताई मुंदडा यांनी अंबाजोगाई जिल्ह्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. एवढेच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उभारणीमध्ये देखील विमालताई मुदडा यांचे मोठे योगदान आहे. असे असताना देखील 2012 नंतरच्या काळात केज विधानसभा मतदारसंघात मुंदडा कुटुंबीयांना डावलले गेले असल्याची खंत अक्षय मुंदडा यांच्या बोलण्यातून व्यक्त होत होती.
यादरम्यान जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात केज विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना उद्यापासून प्रचाराला सुरुवात करण्याचा सल्ला दिला. नमिता मुंदडा यांचा केज विधानसभा मतदारसंघातून विजय निश्चित असेल असा विश्वास जयंत पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.