महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'शांताबाई राठोड पूजा चव्हाणच्या नाहीतर भाजपाच्या आजी' - shantabai rathod news in marathi

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात वनमंत्री असलेल्या संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे. त्यानंतर मोठा गोंधळ उडाला असून राठोड यांच्या राजीनाम्याबाबत समाजामध्ये नाराजी असल्याचेही समोर आलेले आहे.

sangeeta chavan beed
sangeeta chavan beed

By

Published : Mar 4, 2021, 3:04 PM IST

Updated : Mar 4, 2021, 4:36 PM IST

बीड - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात एक दुसऱ्यावर आरोप-प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात होत आहेत. दोन दिवसापूर्वी पूजाची आजी शांताबाई राठोड यांनी पूजाच्या कुटुंबीयांवर पैसे घेऊन हे प्रकरण दाबले जात असल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात गुरुवारी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या बीड जिल्हाध्यक्ष संगीता चव्हाण यांनी म्हटले आहे की, शांताबाई राठोड या पूजाच्या आजी आहेत, की नाही हे माहीत नाही. मात्र त्यांच्या एकंदरीत वागण्या-बोलण्यावरून त्या भाजपाच्या मात्र आजी आहेत, हे स्पष्ट होत आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

'पूजाच्या कुटुंबीयांनी न्याय मागितला नाही'

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात वनमंत्री असलेल्या संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे. त्यानंतर मोठा गोंधळ उडाला असून राठोड यांच्या राजीनाम्याबाबत समाजामध्ये नाराजी असल्याचेही समोर आलेले आहे. दोन दिवसापूर्वी परळी तालुक्यातील धारावती तांडा येथील शांताबाई राठोड या पूजा चव्हाणच्या आजीने पूजाला न्याय मिळावा, असे सांगत पूजाच्या कुटुंबीयांनी आतापर्यंत एकदाही पूजासाठी न्याय मागितला नाही, याचा अर्थ काय घ्यायचा? असे म्हणत, पूजाच्या कुटुंबीयांनी पैसे घेतल्याचा आरोपदेखील केला होता.

शांताबाई यांच्यावर टीका

शांताबाई राठोड यांच्या या आरोपानंतर शिवसेनेच्या महिला आघाडीच्या बीड जिल्हाध्यक्ष संगीता चव्हाण यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना शांताबाई यांच्यावर टीका केली आहे.

'बदनामी जाणीवपूर्वक'

पूजा चव्हाणला न्याय मिळावा म्हणून आजी शांताबाई राठोड यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन पूजाचे वडील लहू चव्हाण यांच्यावर आरोप केले होते. शांताबाई यांच्या आरोपानंतर लहू राठोड यांनी थेट परळी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध मानहानीचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली होती. आता त्यानंतर या वादात शिवसेनेने उडी घेतली असून, शांताबाई राठोड यांच्या आरोपांचे खंडन करताना चव्हाण यांच्या कुटुंबीयांची बदनामी जाणीवपूर्वक केली जात आहे. जे कोणी बीड जिल्ह्यातील लोक पूजा चव्हाणविरोधात बोलतात ते कोणाच्या सांगण्यावरून बोलतात हे बंजारा समाजाच्या लक्षात आलेले आहे, असा आरोप केला.

Last Updated : Mar 4, 2021, 4:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details