महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आम्ही भाजपला मदत का करायची, बीडमधील शिवसैनिकांचा संपर्क प्रमुखांना प्रश्न

शिवसेनेचे बीड लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख आनंद जाधव यांनी शनिवारी बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपविषयीची नाराजी त्यांना बोलून दाखवली.

शिवसेनेचे बीड लोसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख आनंद जाधव

By

Published : Mar 17, 2019, 11:06 AM IST

बीड - राज्यात युतीचे सरकार असतानाही भाजपच्या नेत्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केले. पाच वर्षात ढुंकुनही पाहिले नाही. आता निवडणुका आल्यावर त्यांना शिवसैनिकांची आठवण आली आहे. आम्ही भाजपला मदत का करायची, असा प्रश्न बीडमधील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे बीड लोकसभा संपर्क प्रमुख आनंद जाधव यांना विचारला. यामुळे जाधव निरुत्तर झाले. या प्रकरणामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यात दिलजमाई अद्याप झाली नाही हे समोर आले आहे.


शिवसेनेचे बीड लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख आनंद जाधव यांनी शनिवारी बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपविषयीची नाराजी त्यांना बोलून दाखवली. भाजपकडून चारा छावणीच्या बाबतीतही आमच्यावर अन्याय झाला. तेव्हा भाजला मदत कशी करायची असा प्रश्न शिवसैनिकांनी विचारला. यामुळे संपर्क प्रमुख जाधव यांना काय उत्तर द्यावे हे क्षणभर समजले नाही.

भाजप आणि शिवसेनेने राज्यस्तरावर युती केली आहे. पण, पक्ष नेतृत्वाने केलेली ही युती अजूनही कार्यकर्त्यांच्या गळी उतरली नसल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. दोन्ही पक्षातील धुसफूस निवडणुकीच्या निमीत्ताने बाहेर येत आहे. ज्या पक्षाला आपण कालपर्यंत विरोध केला, त्यांनाच मदत कशी करायची असा प्रश्न कार्यकर्ते नेतृत्वाला विचारू लागली आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांना एकत्र काम करायला लावण्याचे मोठे आव्हान या पक्षांपुढे आहे.

बीडमध्ये विनायक मेटे यांनी भाजपला मदत न करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंसमोर पेच निर्माण झाला आहे. त्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर कशी करायची हा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details