महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shiv Smarak : शिवस्मारक परिसरातील काम निकृष्ट दर्जाचे - Shivsauniks in Beed alleged

शिवस्मारक परिसरातील काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप बीडमधील शिवसौनिकांनी केला आहे. शिवसेनेसह विविध शिवप्रेमींनी शिवस्मारकाचे काम पाडले बंद केले आहे. बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरातील सुशोभीकरणाचे काम गेल्या दोन-तीन दिवसांपासून चालू आहे.

Shiv Smarak
Shiv Smarak

By

Published : Jan 18, 2023, 10:37 PM IST

शिवस्मारक परिसरातील काम निकृष्ट दर्जाचे

बीड -मधील छत्रपती शिवाजी महाराज स्मारका ठिकाणी सुशोभीकरणासाठी आतापर्यंत लाखो रुपयांचे खर्च करण्यात आले आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये आले, मात्र सुशोभीकरण हे निष्कृष्ट दर्जाचे होत आहे. आधी अगोदर देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला सर्कल केला आहे. ते देखील काम निष्कृष्ट दर्जाचे असल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे.

आंदोलनाचा इशारा -आता स्मारकाच्या बाजूला कठडयाचं काम सुरू आहे. यात देखील दर्जाहीन काम चालू असल्याने बीड शहरातील उद्धव ठाकरे यांची शिवसेना, छावा संघटना, शिवप्रेमी यांनी मिळून नगरपालिका सीओ निता अंधारे यांना निवेदन दिले आहे. जर काम दर्जेदार झालं नाही तर, शिवसेनेसह इतर संघटना देखील आंदोलन करतील असा इशारा यावेळेस शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप यांनी दिला आहे.

काय म्हणतात शिवसेना प्रमुख - हा स्टंट काही राजकीय नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. मात्र, या ठिकाणचे काम अत्यंत बोगस पद्धतीचे काम या ठिकाणी चालू आहे. इथल्या शिवप्रेमींना न विचारता बांधकाम कसे करण्यात आले. असा प्रश्न शिवसौनिकांनी विचारला आहे.

नगरपालिकेचा मनमानी कारभार -नगरपालिकेचा कारभार त्यांच्याच मनाने चालू होता, बीड शहरातील ज्या सामाजिक संघटना आहेत त्या सर्वच सामाजिक संघटना एकत्र येत आम्ही सर्वांनी आंदोलन केलं आहे. नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलावून कामाच्या दर्जबाबत त्यांना अवगत केले आहे. संपूर्ण परिसराची पडझड झाली असून तात्काळ काम सुरु करण्यची मागणी त्यांनी केली.

हेही वाचा -PM Modi Mumbai Visit : उद्या पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन आणि लोकार्पण कार्यक्रमांचा धडाका, बृहन्मुंबईच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा समावेश

ABOUT THE AUTHOR

...view details