बीड -महाराष्ट्रात बहुतांश राष्ट्रीयकृत बँकांचे ग्राहक शेतकरी आहेत. मात्र, बँकांची सर्व कागदपत्रे इंग्रजीतून असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना बँक आपल्याकडून काय लिहून घेते हे कळत नाही. यापुढे सर्व राष्ट्रीयीकृत बँकांचे कागदोपत्री व्यवहार मराठीतून करा, अशी मागणी करत बीड येथील बँक ऑफ इंडिया शाखेच्यासमोर शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने शुक्रवारी टाळे ठोको आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्रात शासकीय कामकाज मराठी भाषेत केल्या जाते. मात्र, स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेतला कारभार मराठी भाषेत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. बँकेने आपला कारभार मराठी भाषेत करावा, अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीचे गंगाभिषण थावरे यांनी केली आहे.