बीड- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा वाढदिवस बीडमध्ये कार्यकर्त्यांच्या उपस्थित साजरा झाला. यावेळी सामाजिक न्याय विभागामार्फत दिव्यांग व्यक्तींना सहाय्यक उपकरणे मोफत उपलब्ध करून देण्यासाठी निर्माण केलेल्या 'महाशरद' या डिजिटल प्लॅटफॉर्मचे, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या 'ई-बार्टी' या मोबाईल ऍपचे शरद पवार यांच्या हस्ते व्हर्च्युअली अनावरण करण्यात आले.
बीडमध्ये शरद पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा - Beed Latest News
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बीडमध्ये सामाजिक न्याय विभागामार्फत दिव्यांग व्यक्तींना सहाय्यक उपकरणे मोफत उपलब्ध करून देण्यासाठी निर्माण केलेल्या 'महाशरद' या डिजिटल प्लॅटफॉर्मचे, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या 'ई-बार्टी' या मोबाईल ऍपचे अनावरण करण्यात आले.
बीडमध्ये शरद पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
बीड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाला पालकमंत्री धनंजय मुंडे, बीडचे आ. संदीप क्षीरसागर, माजी आमदार उषा दराडे, माजी आमदार सय्यद सलीम, समता परिषदेचे सुभाष राऊत, सावता परिषदेचे कल्याण आखाडे आदींची उपस्थिती होती. शरद पवार यांच्या 80 वाढदिवसानिमित्त आयोजीत व्हर्च्युअल रॅलीत बोलताना धनंजय मुंडे यांनी पवारांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.