महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

​​​​​​​जिल्ह्यातला चारा संपला जनावरं जगवायची कशी? बळीराजाचा सवाल - severe drought

माणसांना पाणी पिण्यासाठी सरकारने टँकर सुरू केले. मात्र, मुक्या जनावराचे काय? आज घडीला बीड जिल्ह्यातील चारा पूर्णतः संपलेला आहे

दुष्काळ

By

Published : Feb 12, 2019, 8:08 PM IST

बीड - माणसांना पाणी पिण्यासाठी सरकारने टँकर सुरू केले. मात्र, मुक्या जनावराचे काय? आज घडीला बीड जिल्ह्यातील चारा पूर्णतः संपलेला आहे. अशी परिस्थिती असताना देखील अद्याप पर्यंत चारा छावण्या सुरू झालेल्या नाहीत. छावण्या सुरू करण्याचा निर्णय जाचक अटींमुळे अडकला असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. जनावरांना तुराट्या खाऊ घालण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे, चाऱयाविना जिल्ह्यातील शेतकरी हतबल झाला आहे.
दुष्काळी परिस्थितीवर शेतकरी

दुष्काळी परिस्थितीवर शेतकरी बीड जिल्ह्यात सुमारे साडेआठ लाख जनावरे व तीन लाख शेळ्यामेंढ्या आहेत. दुष्काळाची परिस्थिती बिकट बनत चालली आहे. एक एक हजार फूट खोलीचे बोअर घेऊन देखील पाणी लागत नाही. अनेक गावांमध्ये टँकरद्वारे येणारे दूषित पाणी नागरिकांना प्यावे लागत आहे. दुसरीकडे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे जनावरे आहेत त्या शेतकऱ्यांना जनावरे विकल्याशिवाय पर्याय नाही. दुष्काळी परिस्थितीत दुभती जनावरे घेणार तरी कोण? असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. एकंदरीत दुष्काळी भागात उपाय योजनांच्या संदर्भाने हे सरकार गंभीर नाही.दुष्काळ बीड जिल्ह्यात शिल्लक असलेला जनावरांचा चारा संपून एक आठवड्याचा कालावधी उलटला आहे. तरीदेखील छावण्या सुरू करण्याच्या बाबतीत असा कुठलाच ठोस निर्णय सरकार अथवा प्रशासनाने घेतलेला नाही.

दोन आठवड्यांपूर्वी छावण्या सुरु करण्याचा निर्णय झाला. मात्र, त्या निर्णयात अत्यंत जाचक अटी टाकल्या असून अटी दुरुस्तीच्या नावावर छावण्या सुरू करण्यासाठी विलंब केला जात आहे. यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बीड जिल्हा प्रशासनाने डिसेंबरमध्ये राज्य शासनाला दिलेल्या अहवालात म्हटले होते की, बत्तीस दिवसाचा चारा शिल्लक आहे.दुष्काळ बीड तालुक्यातील आनंदवाडी शिवारातील शेतकरी सोळंके यांना जनावरांच्या चाऱ्याचा संदर्भात विचारले असता ते म्हणाले, की आज घडीला माझ्याकडे जनावरांना टाकण्यासाठी चारा नाही. आम्ही वाट बघतोय की, आमच्या शिवारात कुठेतरी छावणी सुरू होईल. आमच्या जनावरांना चारा मिळेल. मात्र, चारा तर दूरच इथे माणसांनादेखील पिण्यासाठी पाणी लवकर मिळत नाही. अशी दुरावस्था झाली आहे. साखर कारखान्यावरील मजूर गावावर येतील तेव्हा.

बीड जिल्ह्यातून ६ लाखांपेक्षा अधिक ऊस तोड मजूर ऊस तोडण्यासाठी गेलेले आहेत. त्या मजुरांच्या बरोबर त्यांची काही जनावरे देखील आहेत. मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात परराज्यात गेलेले बहुतांश मजूर गावावर परतण्याची शक्यता आहे . जेव्हा साडेसहा लाख मजूर बीड जिल्ह्यात वापस येईल तेव्हा अनेक गावांमध्ये चारा व माणसांच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनल्याशिवाय राहणार नाही. याचे कारण म्हणजे आज घडीला प्रशासनाकडे येणाऱ्या मजुरांना व जनावरांना चारापाणी देण्याची योजना तयार नाही, असा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details