बीड -लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी दुसऱ्या टप्प्प्यातील मतदान पार पडले. यात महाराष्ट्रातील १० जागांचा समावेश आहे. बीड लोकसभा मतदार संघात सरासरी ७० टक्के मतदान झाल्याची माहिती आहे. तर निवडणुक लढवत असलेल्या ३७ उमेदवारांचे भवितव्य आता मशीन बंद झाले आहे.
बीड लोकसभेसाठी ७० टक्के मतदान; उमेदवारांचे भवितव्य मशीन बंद - election
बीड लोकसभा मतदार संघात सरासरी ७० टक्के मतदान झाल्याची माहिती आहे. तर निवडणुक लढवत असलेल्या ३७ उमेदवारांचे भवितव्य आता मशीन बंद झाले आहे.
बीड लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील एकूण सहा विधानसभा मतदार संघात गुरुवारी तगड्या पोलीस बंदोबस्तात मतदान पार पडले. जिल्ह्यात सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सरासरी ७० टक्के मतदान झाले. दुपारी उन्हाची तीव्रता वाढल्याने मतदानाची गती मंदावली होती मात्र, दुपारनंतर उन्हाची तीव्रता कमी झाल्यावर मतदानासाठी केंद्रावर गर्दी वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले.
दुपारी दीड वाजेपर्यंत ३६ टक्के तर सायंकाळी ६ वाजेपर्यंत सूत्रांनी दिलेली माहिती नुसार सरासरी ७० टक्के एवढे मतदान झाले. ठिकठिकाणी तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काही किरकोळ घटना वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडले असून, निवडणुक लढवत असलेल्या ३७ उमेदवारांचे भवितव्य आता मशीन बंद झाले आहे.