बीड - राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख राजकीय पक्षांसह १७ उमेदवारांचे २९ अर्ज बीड लोकसभा मतदारसंघासाठी दाखल झाले आहेत. उद्या (मंगळवार) अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.
बीड लोकसभेसाठी १७ उमेदवारांचे २९ अर्ज दाखल, प्रीतम मुंडेंसह बजरंग सोनवणेंचे जोरदार शक्तिप्रदर्शन - bajrang sonawane
राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख राजकीय पक्षांसह १७ उमेदवारांचे २९ अर्ज बीड लोकसभा मतदारसंघासाठी दाखल झाले आहेत.
बीड लोकसभेसाठी १७ उमेदवारांचे २९ अर्ज दाखल
सोमवारपर्यंत बीड लोकसभेसाठीएकमेव अर्ज दाखल झाला होता. मात्र, सोमवारी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाले. राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे आणि भाजपच्या प्रीतम मुंडे यांनी रॅलीद्वारे जोरदार शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. तर राजेंद्र जगताप, सी. जी. शिंदे,जयश्री पाटील, अशोक थोरात, तुकाराम उगले, राजेंद्र होके, एस. व्ही. गदळे, सय्यद सलीम सय्यद फत्तु, रमेश पोकळे, विष्णू जाधव, शेख अमर जैनोद्दीन, पठाण सर्फराज आदींनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.