अंबाजोगाई- कोरोनाच्या महामारीत इंडियन मेडीकल असोसिएशन अंबाजोगाई तर्फे गेल्यावर्षी प्रमाणेच यावर्षीही लोखंडी येथील कोविड सेंटरमध्ये सेवा देण्याचा निर्णय अध्यक्ष डॉ राजेश इंगोले यांच्या नेतृत्वात अनेक डॉक्टरांनी घेतला आहे. या निर्णयामुळे अंबाजोगाई येथील वाढत्या कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी मदत होणार आहे. कोविड सेंटरला रुग्ण संख्या वाढत आहेत. बेड फुल झाले आहेत. भौतिक सुविधा उपलब्ध होऊ शकतात परंतु डॉक्टर, नर्स आणि प्रशिक्षित कर्मचारी कोठून आणणार असा प्रश्न निर्माण झाला असताना अंबाजोगाई येथील डॉक्टरांनी कोविड सेंटरला सेवा देण्याची तयारी दाखवून आदर्श निर्णय घेतला आहे. या बद्दल सर्व डॉक्टर आणि आयएमए संघटनेचे, अध्यक्ष डॉ राजेश इंगोले यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
अंबाजोगाईच्या डॉक्टरांचा आदर्श, कोविड सेंटरला देणार सेवा - अंबाजोगाईतील डॉक्टर देणार कोवीड सेंटरला सेवा
अंबाजोगाईचे डॉक्टर कोविड सेंटरला सेवा देणार आहेत. या निर्णयामुळे अंबाजोगाई येथील वाढत्या कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी मदत होणार आहे.
अंबाजोगाई
अध्यक्ष डॉ राजेश इंगोले आणी त्यांच्या टिमने पहिल्या लाटेतही मोठे योगदान देऊन रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. दुसऱ्याला लाटे तही ते सहभागी होऊन रूग्णसेवा देणार आहेत. लसीकरणासाठी त्यांनी पुढाकार घेऊन सहयोग देणार असल्याचे सांगितले.