बीड :जिल्हा मध्यवर्ती बँक चौसाळा शाखेतील घोटाळा काही संपेना. बीड तालुक्यातील कानडीघाट येथील मयत शेतकरी ग्यानबा बलभीम झोडगे यांच्या खात्यातील १ लाख रूपये परस्पर खात्यातमधुन गायब झाले होते. त्याची चौकशी सुरू असतानाच पुन्हा त्याच गावातील कानडीघाट येथील दुसरे शेतकरी धोंडीबा सर्जेराव कुडके यांच्या खात्यावरील ६२ हजार ४५० रूपये परस्पर काढण्यात आले. आहे. ते जिवंत असल्याचे दाखवून त्यांच्या नावावर प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत जमा रक्कम उचलण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
एकुण ६२ हजार ४५० रूपये परस्पर काढले : बीड तालुक्यातील कानडीघाट येथील शेतकरी धोंडीबा सर्जेराव कुडके यांचा २ सप्टेंबर २०१९ रोजी मृत्यु झाला आहे. त्यांचे जिल्हा मध्यवर्ती बँक चौसाळा शाखेत खाते क्रमांक ००१३११००२०१०७५३ असून त्या खात्यावरील त्यांच्या मृत्यूनंतर११ ऑक्टोबर २०१९. २ हजार रूपये तसेच १४ नोव्हेंबर २०१९ २ हजार रूपये, २३ डिसेंबर २०१९ रोजी १६ हजार, ४ मार्च २०२० रोजी ७ हजार रूपये, ०५ मे २०२० रोजी ५ हजार ७०० रूपये, २० ऑगस्ट २०२० रोजी २ हजार रूपये, ३१ डिसेंबर २०२० रोजी २ हजार रूपये, १५ मार्च २०२१ रोजी ३ हजार ४०० रूपये १९ मे २०२१ रोजी २ हजार रूपये, १७ ऑगस्ट २०२१ रोजी २ हजार रूपये, ०४ जानेवारी २०२२ रोजी २ हजार रूपये, १२ जानेवारी २०२२ रोजी १४ हजार ३५० रूपये, ०४ जुन २०२२ रोजी २ हजार रूपये असे एकुण ६२ हजार ४५० रूपये परस्पर खात्यातमधुन उचलण्यात आले आहेत.
महात्मा फुले कर्जमुक्ती गैरव्यवहार प्रकरणात ३ कर्मचारी निलंबित :बीडच्या गोलंग्री येथील शेतकऱ्यांचे महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ति प्रोत्साहनपर अनुदान योजनेंतर्गत गैरव्यवहार झाला आहे. या प्रकरणात डाॅ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या तक्रारीवरून जिल्हा उपनिबंधक यांनी चौकशीचे आदेश दिले होते. काल १९ जानेवारी रोजी चौकशी करण्यात आली असून चौसाळा शाखेतील ३ जणांना निलंबित करण्यात आले आहे. त्यामध्ये शाखाधिकारी प्रताप बीडकर, तपासणीस ज्ञानोबा जोगदंड, रोखपाल प्रताप कुडके हे तीन कर्मचारी निलंबित करण्यात आले असून घोटाळ्याची मालिकाच हळूहळू बाहेर पडत आहे.