बीड -पालवण येथील वनराई आईच्या डोंगरावर 13 व 14 फेब्रुवारी रोजी देशातील पहिले वृक्ष संमेलन होत आहे. याचाच एक भाग म्हणून, बुधवारी बीड शहरातून वृक्षदिंडी काढण्यात आली. अभिनेता सयाजी शिंदे यांची या दिंडीला विशेष उपस्थिती होती. दिंडीला शहरातील शाळा व महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता.
अभिनेते सयाजी शिंदेंच्या उपस्थितीत बीडमध्ये हजारोंच्या संख्येने निघाली वृक्षदिंडी हेही वाचा - ऐकावं ते नवलच... चक्क वडाच्या झाडाची संमेलनाध्यक्ष म्हणून निवड !
बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून या दिंडीला सुरुवात झाली. सुभाष रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील येथील श्री छत्रपती संभाजी महाराज स्टेडियम येथे समारोप झाला. वृक्षदिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी 'झाडाच्या नावानं चांगभलं' अशी घोषणा देत वृक्ष लागवड व संगोपन आता संदेश दिला विशेष म्हणजे रॅलीमध्ये महिला व मुलींची मोठी संख्या होती. लेझीम पथक व ढोल-ताशाच्या तालावर अनेक विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही ताल धरला होता. या दिंडीमध्ये पाच हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
पुढील दोन दिवस हे देशातील एकमेव वृक्ष संमेलन सुरू राहणार आहे. बीड तालुक्यातील पालवण येथील वनराईच्या डोंगरावर या अनोख्या वृक्ष संमेलनाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वृक्षप्रेमी या संमेलनात सहभागी झालेले आहेत. वृक्षदिंडी प्रसंगी पालखीत वृक्ष ठेवून शहरातून मिरवणूक काढण्यात आली. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची वेशभूषा केली होती.
हेही वाचा - विश्वसुंदरी पेक्षा वृक्षसुंदरी महत्वाची; अभिनेता सयाजी शिंदे यांचे मत