महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Gram Panchayat Election: या जिल्ह्यातील 704 ग्रामपंचायतीपैकी 37 ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध

Gram Panchayat Election: ग्रामपंचायत निवडणूक धुरळा उडाला आहे. बीड जिल्ह्यातील 704 ग्रामपंचायतीपैकी 37 ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध निवडले आहेत.

Gram Panchayat Election
Gram Panchayat Election

By

Published : Dec 8, 2022, 12:18 PM IST

बीड:बीड जिल्ह्यात ग्रामपंचायतीचा धुरळा उडाल्याचा पाहायला मिळतंय. जिल्ह्यातील होऊ घातलेल्या 704 ग्रामपंचायतच्या निवडणुकीपैकी 37 ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. काल अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानंतर हे चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यतील 704 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी 18 डिसेंबरला मतदान आहे.

18 डिसेंबरला मतदान: यावेळी सरपंच निवड थेट जनतेतून आहे. त्यामुळे चुरस तर वाढलीच आहे. शिवाय इच्छुकांच्या संख्येतही भर पडली. 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या दरम्यान सदस्य पदांसाठी 19 हजार 784 तर सरपंचपदासाठी 4 हजार 255 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. 6 डिसेंबरला छाननी प्रक्रिया पार पडली. सरपंच व सदस्यपदाचे 220 अर्ज बाद झाले असून एकूण 23 हजार 468 अर्ज वैध ठरले आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालचा 7 डिसेंबर हा शेवटचा दिवस होता. यामध्ये 37 ठिकाणच्या ग्रामपंचायतचे सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत.

सरपंच पदासाठी व सदस्य पदासाठी: बीड जिल्ह्यातील सरपंच पदासाठी व सदस्य पदासाठी वैद्य ठरलेले अर्ज तालुका निहाय खालीलप्रमाणे आहेत. बीड तालुका एकूण ग्रामपंचायत- 132 प्रभाग -406 सरपंच-713 सदस्य संख्या- 3299, गेवराई ग्रामपंचायत- 76 प्रभाग- २४४ सरपंच- 463 सदस्य-2361, वडवणी ग्रामपंचायत- 25 प्रभाग- 80 सरपंच- 150 सदस्य -710, पाटोदा ग्रामपंचायत- 34 प्रभाग- 109 सरपंच -२१७ सदस्य- 927, माजलगाव ग्रामपंचायत- 44 प्रभाग -137 सरपंच -233 सदस्य- 1147, आष्टी ग्रामपंचायत -109 प्रभाग- 347 सरपंच-741 सदस्य- 3185.

सरपंच पदासाठी व सदस्य पदासाठी: केज ग्रामपंचायत- 66 प्रभाग- 208 सरपंच- ३५२ सदस्य- 1786, धारूर ग्रामपंचायत- 31 प्रभाग -96 सरपंच -167 सदस्य -733, परळी ग्रामपंचायत- ८० प्रभाग २६३- सरपंच- 493 सदस्य- 2297, आंबेजोगाई ग्रामपंचायत- 83 प्रभाग- 271 सरपंच -403 सदस्य- 2151, शिरूर ग्रामपंचायत- 24 प्रभात- 83 सरपंच-165 सदस्य- 775, एकूण- 704 ग्रामपंचायत प्रभाग- 2247 सरपंच 4 हजार 97 सदस्य 19371 यामध्ये 37 ठिकाणच्या ग्रामपंचायतचे सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details