बीड : सुषमा अंधारे यांच्यावर कार्यकर्त्यांना दोन लाख रुपये मागितल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी केला होता. यावरुन जाधव यांनी सुषमा अंधारेंना कानाखाली मारल्याचा दावा केला होता. त्यामुळे आज होणाऱ्या महाप्रबोधन यात्रेत संजय राऊत आणि सुषमा अंधारे काय बोलणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. संजय राऊत यांची तोफही आज महाप्रबोधन यात्रेत धडाडणार आहे.
महाप्रबोधन यात्रेचा समारोप :बीडमध्ये आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाच्या वतीने महाप्रबोधन यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेचा आज बीडमध्ये समारोप करण्यात येणार आहे. या यात्रेत संजय राऊत हे उपस्थित राहणार आहे. यापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रभर महाप्रबोधन यात्रेचे विविध कार्यक्रम घेण्यात आले. मात्र अनेकदा या महाप्रबोधन यात्रेला अडचणीचा सामना करावा लागला. जळगावमध्ये गुलाबराव पाटील यांच्याबद्दल सुषमा अंधारे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
महाप्रबोधन यात्रा वादात : सुषमा अंधारे यांच्या वादग्रस्त वक्तव्याने महाप्रबोधन यात्रा चांगलीच गाजली. उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक अडचणी महाप्रबोधन यात्रेला आल्या आहेत. त्यानंतर बीड जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे यांना दोन चापटा लगावल्या दावा केला. मात्र तो दावा सुषमा अंधारे यांनी फेटाळून लावला. त्यानंतर मोठ्या नाट्यमय घडामोडी झाल्या होत्या. आता त्यामध्ये सुषमा अंधारे यांचे पती वैजनाथ वाघमारे यांनी सुद्धा उडी घेत हा प्रकार निंदनीय असल्याचे सांगितले. या महाप्रबोधन यात्रेसाठी सुषमा अंधारे यांनी 50 लाख रुपये गोळा केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यानंतर वैजनाथ वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत यासंबंधी स्पष्टीकरण दिले. तसेच यानंतर शिंदे गटाचे माजी आमदार सुरेश नवले यांनी देखील याप्रकरणात उडी घेतली आहे.
उद्धव ठाकरे यांचा तडकाफडकी निर्णय :या महाप्रबोधन यात्रेमध्ये शिवसेनेचे नेते संजय राऊत व उपनेत्या सुषमा अंधारे यावेळी सभेला संबोधित करणार आहेत. त्या अगोदर बीड शहरांमधून एक भव्य दिव्य अशी रॅली या ठिकाणावरून काढली जाणार आहे. या रॅलीतून बीड शहरात ठाकरे गट शक्तिप्रदर्शन करणार आहे. उद्धव ठाकरे यांनी तडकाफडकी निर्णय घेत जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव आणि बीड जिल्हाप्रमुख धोंडू पाटील यांची पक्षातून हकलपट्टी केली आहे. ज्या बॅनरवर आप्पासाहेब जाधव यांचे फोटो लावले होते, त्या बॅनरवर शिवसेनेचे मशाल हे चिन्ह लावले आहे. अनेक ठिकाणी त्यांचे फोटो असलेले बॅनर काढण्यात आले आहे. त्यामुळे आज नेमके या सभेमध्ये काय घडते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा -
- Raj Thackeray On Narendra Modi : हिंदू धर्म इतर धर्मीयांमुळे भ्रष्ट होणारा नाही, नोट बंदीची धरसोडवृत्ती चांगली नाही; राज ठाकरेंचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल
- Maharashtra Ministry Expansion : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्ली दरबारी, मंत्रिमंडळाच्या विस्ताराला हिरवा कंदील ?
- KCR On BRS Model In Country : विकासाचे बीआरएस मॉडेल भारतभर नेणार; बीआरएसने सुरू केली 288 मतदार संघात लढण्याची तयारी - केसीआर