महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

म्हणून.. आमदार क्षीरसागर यांनी जोडले तरुणांना हात - बीड बातमी

शुक्रवारी संदीप क्षीरसागर यांनी आचारसंहिता शिथिलतेच्या दरम्यान जिल्हा प्रशासनाच्या कामकाजाचा आढावा घेतला. शनिवारपासून बीड शहरातील साफसफाईसाठी पन्नास ट्रॅक्टर व दोनशे मजूर वाढविण्याच्या सूचना बीड नगरपालिका प्रशासनाला क्षीरसागर यांनी दिल्या आहेत.

sandeep-kshirsagar-appeal-to-people-stay-at-home-in-beed
संदीप क्षीरसागर यांनी जोडले तरुणांना हात..

By

Published : Mar 27, 2020, 2:33 PM IST

बीड- कोरोना विषाणूचे वैश्विक संकट निर्माण झाले आहे. प्रशासन मोठ्या धैर्याने उपाययोजना करत आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घरात बसून प्रशासनाला सहकार्य करावे. संचारबंदी दरम्यान तरुणच जास्त प्रमाणात घराच्या बाहेर पडत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आज पासून तरुणांनी घराच्या बाहेर पडणे बंद करा, अशी विनंती आमदार संदीप क्षीरसागर तरुणांना हात जोडून विनंती केली आहे.

संदीप क्षीरसागर यांनी जोडले तरुणांना हात..

हेही वाचा-#CORONA : नागपुरात आढळले कोरोनाचे आणखी 4 नवे रुग्ण, एकूण संख्या 9 वर

शुक्रवारी संदीप क्षीरसागर यांनी आचारसंहिता शिथीलतेच्या दरम्यान जिल्हा प्रशासनाच्या कामकाजाचा आढावा घेतला. शनिवारपासून बीड शहरातील साफसफाईसाठी पन्नास ट्रॅक्टर व दोनशे मजूर वाढविण्याच्या सूचना बीड नगरपालिका प्रशासनाला क्षीरसागर यांनी दिल्या आहेत. कोरोनाची गंभीरती लक्षात घेता. नागरिकांनी घरातच रहावे, काळजी घ्यावी, संचारबंदी दरम्यान अनेक वेळा तरुण रस्त्याने फिरताना आढळून येतात. यामुळे पोलीस प्रशासनाला देखील त्रास होतो. त्यामुळे तरुणांनी घरातच बसावे असेही त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा तिसरा दिवस आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details