महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाळू वाहतुकदारांनी मांडली जिल्हाधिकाऱ्यांकडे कैफियत; म्हणाले, आम्ही दोषी तर आम्हाला मदत करणारेही तितकेच दोषी - पोलीस अधिकारी

बीडमध्ये वाळू वाहतूकदारांनी जिल्हा प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांवर हप्तेखोरीचे आरोप केले होते. याबाबत जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांनी गुरुवारी मंडळ अधिकारी, तलाठी व वाळू वाहतूकदार यांची समोरासमोर चर्चा घडवून आणली. यावेळी वाळू वाहतूकदारांनी आपली कैफियत जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडली.

वाळू वाहतुकदारांनी मांडली जिल्हाधिकाऱ्यांकडे कैफियत

By

Published : Jun 28, 2019, 5:26 AM IST

Updated : Jun 28, 2019, 1:26 PM IST

बीड- मागील आठ दिवसापासून वाळू वाहतूकदारांनी जिल्हा प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांवर हप्तेखोरीचे आरोप केले होते. याबाबत जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांनी गुरुवारी मंडळ अधिकारी, तलाठी व वाळू वाहतूकदार यांची समोरासमोर चर्चा घडवून आणली. यावेळी वाळू वाहतूकदारांनी आपली कैफियत जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडली.

वाळू वाहतुकदारांनी मांडली जिल्हाधिकाऱ्यांकडे कैफियत

यावेळी मंडळ अधिकारी, तलाठी व काही पोलिस अधिकाऱ्यांनी मोबाईलवर केलेले एसएमएस व काही संभाषण थेट जिल्हाधिकाऱ्यांना वाळू वाहतूकदारांनी दाखवले. ते ऐकून जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे थक्क झाले.

बीड जिल्ह्यात वाळू वाहतूक करणाऱ्यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकारी कशा पद्धतीने हप्ते घेतात, त्याचा हिशोबच जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात मांडला होता. या प्रकारावरून संपूर्ण बीड जिल्हा प्रशासनाची नाचक्की झाली. हे वाळू प्रकरण मार्गी काढायचे कसे? असा प्रश्नदेखील उपस्थित झाला होता. अखेर जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांनी गुरुवारी नोटीसद्वारे वाळू वाहतूक करणाऱ्या १२ व्यक्तींना व संबधित तलाठी, मंडळ अधिकारी यांना समोरासमोर बोलावून घेऊन सोक्षमोक्ष लावला.

यावेळी जिल्हाधिकारी यांच्या बंद कक्षामध्ये वाळू वाहतूकदारांनी केलेले आरोप गंभीर स्वरूपाचे होते. जर आमचा व महसूल विभागातील संबंधित अधिकारी तसेच पोलीस विभागातील अधिकाऱ्यांचा काही संबंध नाही तर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आम्हाला फोन लावून वाळू वाहतुकीचा हप्त्याबाबत का संवाद साधला ? असा कळीचा मुद्दा वाळू वाहतूकदारांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडला.

यापुढे जाऊन वाळू वाहतूकदारांनी म्हटले, की जर आम्ही चोरी केली असेल आणि जर आम्ही दोषी असेल तर आम्हाला चोरी करायला मदत करणारे प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी देखील तितकेच दोषी आहेत, असे मत त्यांनी मांडले. दरम्यान, या सगळ्या घडामोडीनंतर जिल्हाधिकारी दोषी अधिकाऱ्यांसंदर्भात काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Last Updated : Jun 28, 2019, 1:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details