बीड- विधानसभा निवडणुकीसाठी संभाजी ब्रिगेड बीड जिल्ह्यात 6 विधानसभा मतदारसंघांपैकी बीड विधानसभा मतदारसंघात आपला उमेदवार देणार असल्याचे संकेत मिळत आहेत. रविवारी बीड येथे जिल्ह्यातील संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यावेळी राहुल वाईकर यांच्या नावाची चर्चा बीड विधानसभेसाठी बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.
हेही वाचा -बीडच्या राजकारणात महिलांचा दबदबा; प्रश्न मात्र आजही कायम
राज्यातील काही महत्त्वपूर्ण जागांवर संभाजी ब्रिगेड आपला उमेदवार देणार आहे. यापैकी बीड विधानसभा मतदारसंघातून संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राहुल वाईकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. याबाबत रविवारी बैठक झाली. बैठकीत राहुल वाईकर यांच्या नावाची चर्चा झाली. एकंदरीत बीड विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे लक्षात घेता मराठा समाजाचा उमेदवार म्हणून सध्यातरी राहुल वाईकर यांचे नाव पुढे येत आहे.
हेही वाचा - गेवराईच्या आमदारांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच वाऱ्यावर सोडले - विजयसिंह पंडित
या बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष मुकुंद गोरे, जिल्हाप्रसद्धि प्रमुख योगेश नरवडे, जिल्हा संघटक गणेश धुमाळ, जिल्हा प्रचारक भागचंद झांजे, संभाजी ब्रिगेडचे बीड तालुकाध्यक्ष रंजीत दुबाले, गेवराई तालुकाध्यक्ष सचिन आहेर, आष्टी तालुकाध्यक्ष अविनाश जगताप, पाटोदा तालुकाध्यक्ष प्रा. महेंद्र मोरे, शिरूर कासार तालुकाध्यक्ष कर्ण तांबे, गेवराई विधानसभाध्यक्ष सोपान दळवी, गेवराई शहराध्यक्ष गणेश मोटे, सुसेन माने, बाळासाहेब माने यांची उपस्थिती होती.